मक्यावर लष्करी अळी; औषधांची फवारणी करूनही नियंत्रण मिळेना:आळंद, उमरावती, सताळा आदी गावच्या शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा

प्रतिनिधी | आळंद फुलंब्री तालुक्यात यंदाच्या हंगामात समाधानकारक व वेळेवर आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. तालुक्यात २३,६५२ हेक्टरवर मक्याची पेरणी करत शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मका लागवड केली. पीक बहरात असतानाच, आता मका पिकावर लष्करी अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत सापडले आहेत. आळंद, उमरावती, सताळा, पिंप्री, नायगव्हाण, जातवा यासह अनेक परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात ही समस्या गंभीर रूप धारण करत आहे. अळीचा वाढता प्रादुर्भाव आणि फवारण्या निष्फळ ठरत असल्याने लष्करी अळीने मक्याची पाने आणि शेंडे पूर्णपणे कुरतडून टाकले आहेत. यामुळे मका पीक अक्षरशः धोक्यात आले आहे. अनेक शेतकऱ्यांनी महागडी कीटकनाशके फवारून पाहिली, मात्र त्याचा अपेक्षित परिणाम दिसून आलेला नाही. अळ्यांनी संपूर्ण पिकावर हल्ला केल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. "फवारणी करूनही काहीही फायदा झाला नाही, कोणती औषधी फवारायची हेच कळत नाहीये’, अशी प्रतिक्रिया आळंद येथील एका शेतकऱ्याने दिली. मक्याची पाने कुरतडली जात आहेत, काही ठिकाणी पाने लाल होत असून बुरशीचाही प्रादुर्भाव दिसत आहे, असे शेतकरी सांगत आहेत. काही दिवसांपूर्वी कृषी विभागाने लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढल्याचे सांगितले होते. त्यावेळी शेतकऱ्यांनी फवारण्या केल्या, परंतु त्यांचा म्हणावा तसा फायदा झाला नाही. आता मात्र संपूर्ण पीक धोक्यात असताना कृषी विभागाकडून कोणतीही ठोस मदत किंवा मार्गदर्शन मिळत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. शासनाकडून औषधी नाही मका पिकावर आलेल्या अळीबाबत आम्ही अनेक ठिकाणी निरीक्षण नोंदवत आहोत. या बाबतचा अहवाल वरिष्ठांना पाठविण्यात येत आहे. मात्र यावर शासनकडून सल्ला व मार्गदर्शन करण्यात येत आहे. कीटकनाशक किंवा कुठलीही औषधी शेतकऱ्यांना उपलब्ध नसल्याने ती मिळणार नाहीत. - कैलास चौधरी , कृषी सहायक

Aug 4, 2025 - 12:25
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow