‘गरजू नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी प्रशासनाने लक्ष द्यावे’:महसूल सप्ताहाचे आमदार विलास भुमरे यांच्या हस्ते उ‌द्घाटन

प्रतिनिधी | पैठण गरजू नागरिकांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहचाव्यात, यासाठी प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे. अशी अपेक्षा आमदार विलास भुमरे यांनी व्यक्त केली. तहसील कार्यालयात महसूल सप्ताहाचे उ‌द्घाटन आमदार विलास भुमरे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. तहसीलदार ज्योती पवार, तुषार पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. महसूल सप्ताहानिमित्ताने आमदार विलास भुमरे यांच्या हस्ते संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत ६३९ लाभार्थी यांना सदर योजनेचा लाभ देण्यात आला असून, प्रातिनिधीक स्वरुपात मायगाव, नवगाव, चांगतपुरी, वडाळी आदी गावातील लाभार्थींनी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. तसेच रहिवासी, उत्पन्नाचे, अधिवास व राष्ट्रीय प्रमाणपत्र आदी ३४८ प्रमाणपत्रांचे वाटप आमदार भुमरे यांच्या उपस्थिती करण्यात आले. तहसीलदारांनी गुरूवारपर्यंत (दि. ७) राबविण्यात येणाऱ्या या सप्ताहाविषयी माहिती दिली. कार्यक्रमामध्ये नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शेखर शिंदे, सोमनाथ परदेशी, भुषण कावसाणकर, किशोर तावरे, प्रदिप नरके, किशोर दसपुते आदी उपस्थित होते.

Aug 4, 2025 - 12:25
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow