शेतकऱ्यांची लूट:सिल्लोडला युरियाची कृत्रिम टंचाई; २६६ गोणी ४५० रुपयांपर्यंत विक्री; २३ हजार टन मागणीच्या तुलनेत आजवर १७ टनच युरिया मिळाला
प्रतिनिधी | सिल्लोड तालुक्यात युरिया खताची कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात आली असून, युरिया हवा असल्यास इतर मिश्रखत घेण्याचा आग्रह कृषी दुकानदारांकडून केला जात आहे. मिश्रखताच्या तीन बॅगांवर एक युरियाची बॅग दिली जात आहे. तालुक्यात यंदा मकाचा पेरा वाढल्याने युरियाची मागणी वाढली आहे. त्यात टंचाई निर्माण झाल्याने युरियाची चढ्या भावाने विक्री केली जात असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांमधून केल्या जात आहेत. यंदा वेळेवर पाऊस झाल्याने तालुक्यात ९७ हजार हेक्टरवर खरीप पिकांचा पेरा झाला असून, कृषी विभागाकडून २३ हजार टन युरिया खताची मागणी करण्यात आली होती. या पैकी १७ हजार टन युरिया उपलब्ध झालेला आहे. तर, गरजेनुसार तालुक्याला अजून ६ हजार मेट्रिक टन युरियाची गरज आहे. गरजेएवढा युरिया उपलब्ध झालेला नसल्याने टंचाई निर्माण झाली असून याचा फायदा घेत कृषी दुकानदार चढ्या भावाने विक्री करीत असल्याचे आढळून येत आहे. राज्यात मकाचा तालुका म्हणून सिल्लोडची ओळख आहे. मात्र मागील चार- पाच वर्ष मकाचे उत्पन्न व खर्चाचा शेतकऱ्यांना चक्क २६६ रुपयांची युरिया गोणी ४१० ते ४५० पर्यंत विक्री केल्या जात आहे. या बाबत अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत. आता मका पिकाला युरियाची गरज भासत असल्याने, शेतकरी नाईलाजास्ताव ज्यादा पैसे देऊन युरिया खत खरेदी करीत आहेत. या माध्यमातून दुकानदार शेतकऱ्यांची आर्थिक लुबाडणूक करीत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. तरीही याबाबत संबंधित विभागाकडून कडक कारवाई होत नाही. ^मी दोन दिवसांपूर्वी तालुका कृषी अधिकारी पदाचा कारभार हाती घेतला आहे. याबाबत संपूर्ण माहिती घेणार आहे. तालुक्यात यंदा मका व सोयाबीनचा पेरा वाढल्याने युरिया खताची मागणी वाढली आहे. गरजेपेक्षा युरियाचा पुरवठा कमी झाल्याने काही अंशी युरियाची टंचाई निर्माण झाली. दुकानदार चढ्या भावाने विक्री करत असल्यास तक्रार करा. -संदीप जगताप, तालुका कृषी अधिकारी, सिल्लोड तालुक्यातील सव्वा दोनशे कृषी सेवा केंद्र सध्या स्थितीत चालू आहेत. या दुकानांच्या तपासणीसाठी आधी उपविभागीय कृषी अधिकारी, तंत्र अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीचे तालुका कृषी अधिकारी यांना अधिकार होते. मात्र आता वरील सर्वांचे अधिकार काढून तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी अधिकारी यांना देण्यात आले आहे. ताळमेळ बसत नसल्याने शेतकरी सोयाबीन पिकाकडे वळले होते. या बरोबरच कापसाचहीे क्षेत्र वाढले होते. मागील एक- दोन वर्षांपासून कापूस, सोयाबीन पिकाचा खर्च व उत्पन्नाचा ताळमेळ न बसल्याने शेतकरी पुन्हा मका पिकाकडे वळला आहे. यामुळे तालुक्यात यंदा मकाचा पेरा चांगला वाढला आहे. गेल्या वर्षी ४१ हजार हेक्टरवर मकाची पेरणी होती. तर यावर्षी ४९ हजार हेक्टरवर मकाची पेरणी करण्यात आलेली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ८ हजार हेक्टर मकाचे क्षेत्र वाढले आहे.

What's Your Reaction?






