महाराष्ट्र स्टार्टअप, उद्योजकता आणि नाविन्यता धोरण 2025 जाहीर:राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; वाढवण बंदर ते समृध्दी महामार्ग जोडणाऱ्या फ्रेट कॉरिडॉरला मंजुरी

महाराष्ट्र स्टार्टअप, उद्योजकता आणि नाविन्यता धोरण 2025 जाहीर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. इतकेच नाही तर वाढवण बंदर ते समृध्दी महामार्ग यांना जोडणाऱ्या फ्रेट कॉरिडॉरला देखील मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या बरोबरच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अतिरिक्त जमिनींचा व्यापारी तत्वावर वापर करण्यासाठी सुधारित धोरणास मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे महामंडळाचे उत्पन्न वाढीसाठी मदत होणार आहे. महामंडळाच्या माध्यमातून पेट्रोल पंप चालवण्याचा निर्णय मंत्र्यांनी घेतला होता. त्याच सोबत आता या निर्णयामुळे महामंडळ तोट्यातून बाहेर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंत्रिमंडळाचे निर्णय देखील पहा...

Aug 5, 2025 - 16:49
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow