प्रत्येक बारमध्ये नाचगाणे चालत नाही:भरत गोगावलेंचे मनसेच्या तोडफोडीवर भाष्य; बार संपूर्ण महाराष्ट्रात असल्याचा दिला दाखला
राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले यांनी बारमध्ये तोडफोड करण्याच्या मुद्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर शरसंधान साधले आहे. राज्यात सर्वत्र बार आहेत. पण सगळीकडेच हिडीस - फिडीस गोष्टी चालत नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे. शेतकरी कामगार पक्षाचा 78 वा वर्धापन दिन नुकतीच पनवेलमध्ये साजरा झाला. त्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवी मुंबई व पनवेलसह रायगड जिल्ह्यातील वाढत्या डान्स बारचा मुद्दा उपस्थित केला. रायगड हा छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेला जिल्हा. महाराजांचा राज्यकारभार ज्या किल्ल्यावरून चालला, त्या किल्ल्यावरून या जिल्ह्याला रायगड हे नाव पडले. असे असताना आता रायगडची ओळख डान्सबारचा जिल्हा म्हणून होत आहे, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानानंतर लगेचच मनसैनिकांनी जुन्या मुंबई - पुणे महामार्गावरील नाईट रायडर नामक बारची तोडफोड केली होती. सर्वच बारमध्ये नाचगाणी चालत नाहीत पत्रकारांनी मंगळवारी याविषयी मंत्री भरतशेठ गोगावले यांना छेडले असता त्यांनी मनसेला संयमाने घेण्याची सूचना करत सर्वच बारमध्ये नाचगाणे चालत नसल्याची बाब स्पष्ट केली. बार संपूर्ण महाराष्ट्रात आहेत. पण सगळीकडेच हिडीस - फिडीस गोष्टी चालत नाहीत. ज्या बारमध्ये गैरवर्तन होत असेल, चुकीच्या गोष्टी होत असतील, तो भाग वेगळा, पण संपूर्ण महाराष्ट्रात बार आहेत. तिथे काय चालते हे समजून घेणे फार गरजेचे आहे. मुळात बार म्हणजे काय? खाण्या-पिण्याचेही बार असतात. सगळ्याच बारमध्ये नाचगाणी चालतात, अशातला काही भाग नाही. अनेक बारमध्ये ऑर्केस्ट्रा चालतात. पण तिथे काही चुकीचे घडत असेल तर सरकार त्या बारवर कारवाई करून बंदी आणेल. करमणुकीच्या काही गोष्टींना परवानगी आहे. सगळ्या बारमध्ये हिडीस - फिडीस काही दाखवले जात नाहीत, असे ते मनसेला उद्देशून म्हणाले. उल्लेखनीय बाब म्हणजे मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी डान्स बारमधील तोडफोडीचे जोरदार समर्थन केले होते. सरकारने या अवैध बारविरोधात कठोर कारवाई करावी. या प्रकरणी ते बार चालवत आहेत की तिला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत? सरकार हे बार बंद करणार नसेल, तर लोक आपल्या पद्धतीने कारवाई करतील, असे ते म्हणाले होते. हे ही वाचा... संविधान हटवणे हाच भाजप, मनुवादी विचारांचा खरा अजेंडा:रोहित पवार यांचा घणाघात; संभाजी भिडे यांच्या विधानाचा घेतला समाचार मुंबई - संविधान हटवणे हाच भाजप व मनुवादी विचारांचा खरा अजेडा असल्याची जहाल टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी भाजप व शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यावर निशाणा साधताना केली. संतानी दिलेला समता, मानवता व सामाजिक न्यायाचा तथा शिव - फुले - शाहू - आंबेडकरांचा विचार संपवणे कुणालाही शक्य नसल्याचेही ते यावेळी जोर देत म्हणाले. वाचा सविस्तर

What's Your Reaction?






