निशिकांत दुबेविरोधात मनसे कोर्टात:नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात अवमान याचिका; मनसे स्टाईलने धडाही शिकवण्याचा इशारा

हिंदी - मराठीच्या वादाच्या आगीत सातत्याने तेल ओतण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजप खासदार निशिकांत दुबे यांना अखेर मनसेने कोर्टात खेचले आहे. मनसेच्या येथील एका पदाधिकाऱ्याने दुबे यांच्याविरोधात अवमाननेची याचिका दाखल करत त्यांना मनसेच्या स्टाईलने धडा शिकवण्याचा इशारा दिला आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, मनसेचे नाशिक शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांनी निशिकांत दुबे यांच्याविरोधात नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात अवमानना याचिका दाखल केली आहे. कोंबडे यांनी गत 14 जुलै रोजी एक पत्रकार परिषद घेतली होती. त्यात त्यांनी दुबे यांना महाराष्ट्रातील जनतेची माफी मागा, अन्यथा अवमाननेच्या कारवाईला सामोरे जा असा इशारा दिला होता. पण त्यानंतरही दुबे यांनी या प्रकरणी माफी मागितली नाही. त्यामुळे कोंबडे यांनी त्यांच्याविरोधात अवमाननेचा दावा दाखल केला आहे. त्याच्या या कारवाईमुळे आगामी महापालिका निवडणुकीत मराठी - अमराठीचा वाद चांगलाच गाजण्याची शक्यता आहे. निशिकांत दुबेला धडा शिकवण्याचा निर्धार सुदाम कोंबडे याविषयी बोलताना म्हणाले की, भाजपचे मुजोर खासदार निशिकांत दुबे यांना आम्ही 15 दिवसांपूर्वी नोटीस बजावली होती. या नोटीसीद्वारे मराठी भाषा तथा राज व उद्धव ठाकरे यांच्याविषयी त्यांनी केलेल्य विधानाविषयी माफी मागण्याची मागणी केली होती. पण दुबे यांनी त्याला कोणताही प्रतिसाद दिला नाही. तसेच माफीही मागितली नाही. त्यामुळे आता मनसे त्यांना आपल्या पद्धतीने धडा शिकवेल. त्यानुसार आम्ही जिल्हा व सत्र न्यायालयात त्यांच्याविरोधात याचिका दाखल केली आहे. निशिकांत दुबे नाशिकला आले तर मनसे त्यांना आपल्या स्टाईलने धडा शिकवेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. दुबे - ठाकरेंची एकमेकांवर टीका विशेष म्हणजे महाराष्ट्रात गत काही महिन्यांसाठी मराठी विरुद्ध हिंदीच्या मुद्यावरून रान पेटले आहे. निशिकांत दुबे यांनी या वादात उडी घेत राज व उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. आपल्या घरात कुणीही वाघ असतो. तुमच्यात हिंमत असेल तर बिहार, तामिळनाडू, उत्तर प्रदेशात या, तुम्हाला काय ते दाखवून देऊ. महाराष्ट्राबाहेर या. आम्ही तुम्हाला उचलून मारू, असे ते म्हणाले. त्यांच्या या विधानानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांना अरबी समुद्रात बुडवून मारण्याची भाषा केली होती. दुबे तुम मुंबई में आ जाओ, मुंबई के समंदर में डुबे डुबे कर मारेंगे, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानानंतर पुन्हा दुबे यांनी मराठीच्या मुद्यावरील आपली भूमिका स्पष्ट केली होती. तसेच महाराष्ट्रात हिंदी व मराठी भाषिक बरोबरीने राहत असल्याचा दावाही केला होता. महाराष्ट्रात सर्वच भाषिक राहतात एका पॉडकास्टमध्येही बोलताना ते म्हणाले होते, मुंबई गुजरातचा भाग होती. मुंबई महाराष्ट्रात नव्हती. 1956 मध्ये भाषा पुनर्रचनेनुसार तेव्हा मुंबईचा महाराष्ट्रात समावेश झाला. चांगली गोष्ट आहे. महाराष्ट्रात मराठी भाषिकांची संख्या 31-32 टक्के एवढीच आहे. तेवढेच म्हणजेच 31-32 टक्के हिंदी भाषिक महाराष्ट्रात राहतात. 2 टक्के भोजपुरीही महाराष्ट्रात आहेत. 12 टक्के गुजराती भाषिक आहेत. 3 टक्के तेलुगु, 3 टक्के तामीळ, 2 टक्के राजस्थानी, 11 ते 11 टक्के उर्दू भाषिक महाराष्ट्रात आहेत. सगळे तिथे राहतात, असे दुबे म्हणाले होते.

Aug 5, 2025 - 16:49
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow