शिंदेंच्या शिवसेनेत 'पक्ष प्रवेश घोटाळा'?:आदिवासी नेत्यावर बोगस यादी सादर केल्याचा आरोप; अहिल्यानगरच्या राजकारणात खळबळ

राज्यातील राजकीय वर्तुळात अनेक प्रकारचे घोटाळे ऐकायला मिळतात, पण आता थेट पक्ष प्रवेशामध्येच घोटाळा झाल्याचा एक अनोखा प्रकार समोर आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करताना, अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील एका आदिवासी नेत्याने बोगस यादी सादर करून पक्षाची दिशाभूल केल्याचा आरोप होत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या संभाव्य अहिल्यानगर जिल्हा दौऱ्याच्या आधीच या आरोपाने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. काय आहे नेमके प्रकरण? अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यातील पंचायत समितीचे माजी उपसभापती मारुती मेंगाळ हे आदिवासी ठाकर समाजाचे एक मोठे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी तीन महिन्यांपूर्वी (26 एप्रिल रोजी) आपल्या समर्थकांसह ठाणे येथे जोरदार शक्ती प्रदर्शन करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांनी आपल्यासोबत अकोले तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींचे सरपंच आणि सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, तसेच विविध पक्ष-संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते असल्याचा दावा केला होता. मात्र, मेंगाळ यांच्यासमवेत पक्ष प्रवेश केलेल्या लोकांची यादी समोर आल्यानंतर यात अनेक नावे बोगस असल्याचा आरोप केला जात आहे. यादीत नाव असणाऱ्या अनेकांनी स्वतः व्हिडिओ प्रसारित करून, आपण असा कोणताही पक्षप्रवेश केला नसल्याचे स्पष्ट केले आहे. 40-50 लोकांची नावे बोगस- दराडे या सर्व प्रकारानंतर शिवसेना (शिंदे गट) चे शिर्डी लोकसभा संपर्कप्रमुख बाजीराव दराडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "मारुती मेंगाळ यांच्या पक्ष प्रवेशावेळी पक्षाने आम्हाला कल्पना दिली नाही. काही दिवसांपूर्वी प्रवेशाची यादी समोर आल्यानंतर अनेकांनी हरकती घेतल्या. शहानिशा केल्यानंतर यादीतील 40 ते 50 लोकांची नावे बोगस असल्याचे समोर आले आहे, असे दराडे यांनी सांगितले. पक्षाची आणि वरिष्ठ नेत्यांची दिशाभूल झाल्याचे आम्ही त्यांना कळवले असून, या प्रकारामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याने वरिष्ठांनी योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी दराडे यांनी केली आहे. मेंगाळ उद्या भूमिका मांडणार 9 ऑगस्ट रोजी आदिवासी दिनाचे औचित्य साधून मारुती मेंगाळ यांनी अकोले येथे एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, ज्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र, या दौऱ्यापूर्वी मेंगाळ यांच्यावर पक्ष प्रवेश घोटाळ्याचा आरोप झाल्याने एकनाथ शिंदे आणि वरिष्ठ नेते काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या सर्व आरोपांवर स्पष्टीकरण देण्यासाठी मारुती मेंगाळ यांनी उद्या पत्रकार परिषद घेणार असल्याचे सांगितले आहे.

Aug 5, 2025 - 16:50
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow