छत्रपती संभाजीनगरमध्ये फिल्मी स्टाइल चोरी फसली:थार गाडीने एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न; थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद

छत्रपती संभाजीनगरमध्ये चोरट्यांनी फिल्मी स्टाइलमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शहानूरवाडी दर्गा परिसरात एसबीआय बँकेच्या शाखेतील एटीएम मशीन थेट थार गाडीला दोरीने बांधून ओढून नेण्याचा आणि फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेत एटीएम मशीनचे तसेच केबिनमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. चोरट्यांनी मध्यरात्री ही उठाठेव केली. चोरीचा प्रयत्न अपयशी ठरला असला, तरी त्यातील धाडस पाहता संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. चोरट्यांचा थार वापरातील हा धक्कादायक प्रकार सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

Aug 5, 2025 - 16:53
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow