जामनेर शहरातील टवाळखोरांना पोलिसांकडून चोप; कारवाईचे स्वागत:मुलींचा पाठलाग, छेडखानीचे प्रकार वाढल्याची होती ओरड
येथे मंगळवारी सकाळी मुलींना त्रास देणाऱ्या टवाळखोरांना पोलिसांनी चोप दिला. शहरात मुलींचा पाठलाग करून छेडखानी करण्याचा प्रकार वाढला आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत आहे. शहरातील काही विशिष्ट भागात टवाळखोरांकडून मुलींची छेड काढण्याचे प्रकार वाढले आहेत. मंगळवारी सकाळी सुपारी बाग परिसरात पंधरा-वीस टवाळखोर विद्यार्थी मुलींची छेड काढत होते. याबाबत सुपारी बाग परिसरातील नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिस येताच या टवाळखोरांची धावपळ उडाली. यावेळी पोलिसांनी काही टवाळखोरांना चांगलाच चोप दिला. तर काहींच्या दुचाकी पोलिस ठाण्यात नेऊन पालकांना बोलवण्याच्या सूचना केल्या. यामुळे या विद्यार्थ्यांची चांगलीच भंबेरी उडाली. नागरिकांकडून कारवाईचे स्वागत तालुकाभरातील विविध गावांमधून विद्यार्थी, विद्यार्थिनी शिक्षणासाठी जामनेरला ये-जा करीत असतात. असे अनेक विद्यार्थी विविध ठिकाणी गटागटाने एकत्र येऊन मुलींचा पाठलाग करतात. यामुळे या मुलींना त्रास सहन करावा लागतो. मंगळवारी पोलिसांनी केलेल्या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत स्वागत होत आहे.

What's Your Reaction?






