भाजपने आता वन नेशन वन हसबंड सुरू केले आहे का?:हा कोणता जिहाद सुरू केलाय? सिंदूर वाटपावर संजय राऊतांचा जोरदार निशाणा

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजपने आता वन नेशन वन हसबंड सुरू केले आहे का? असा सवाल त्यांनी विचारला आहे. भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत कारवाई करत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. या ऑपरेशनची माहिती सर्वांना माहिती व्हावी म्हणून भाजपने घरोघरी सिंदूर वाटप सुरू केले आहे. यावरून संजय राऊत यांनी जोरदार निशाणा साधला आहे. संजय राऊत म्हणाले, सिंदूर आपला पती आपल्या पत्नीला देत असतो, कोणी बाहेरचा व्यक्ती दुसऱ्याच्या घरात जाऊन सिंदूर नाही देत. हा कोणता जिहाद सुरू केला आहे यांनी. जसे तुम्ही वन नेशन वन इलेक्शन आणले तसे आता वन नेशन वन हसबंड आणले आहे का? कोण कोणाचा पती? याबद्दल माध्यमांनी त्यांना प्रश्न विचारला पाहिजे, अशी खरमरीत टीका संजय राऊत यांनी भाजपवर केली आहे. संजय राऊत यांना वेड लागले आहे - अतुल भातखळकर संजय राऊत यांनी साधलेल्या या जोरदार निशाण्यावर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, संजय राऊत यांना वेड लागले आहे. त्यामुळे वेड्याच्या बडबडीकडे काय लक्ष द्यायचे. तुम्हाला एवढी हाऊस का आहे, वन नेशन वन हसबंड, काय बोलतात? म्हणजे वेड लागले आहे त्याच्याही पलीकडे ते गेले आहेत. पुढे बोलताना अतुल भातखळकर म्हणाले, इतक्या बाश्कळ, फालतू भ्रष्टाचाराखाली तुरुंगवास भोगून आलेल्या माणसाच्या विधानांवर, बाश्कळ विधानांवर काहीही प्रतिक्रिया दिली पाहिजे असे मला वाटत नाही. सगळा देश आनंदात आहे. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून देशाने पाकिस्तानला धडा शिकवला आहे. त्यांनी जो भ्याड हल्ला केला होता त्याचा बदला घेतलेला आहे. त्यामुळे सर्व जगात आज या देशाकडे अभिमानाने बघितले जाते. अशा वेळेला संजय राऊत सारखा एक वेडा इसम काय बडबडतोय याला कोणीही किंमत देत नाही. ही पण बातमी वाचा संजय राऊत पांढऱ्या पायाचा माणूस:ते जिथे जातात तिथे सगळे संपते, गुलाबराव पाटलांचा जोरदार टोला संजय राऊत पांढऱ्या पायाचा माणूस आहे, ते जिथे जातील तिथे सगळे संपत असल्याची टीका मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे. जळगाव येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. विधानसभा निवडणुकीत जळगाव जिल्ह्यातील शिंदे गटाचे पाच आमदार पाडण्याचे आव्हान देत संजय राऊत जळगावमध्ये आले होते. परंतु त्यांना उमेदवार सुद्धा मिळत नव्हते, ते एकही आमदार पाडू शकले नाहीत, असे गुलाबराव पाटील म्हणाले.​​​​​​​ वाचा सविस्तर

Jun 2, 2025 - 03:43
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow