धान्य कणांतून साकारले शिर्डीच्या साईबाबांचे सुंदर रूप:आठ विक्रम संस्थांकडून मान्यता मिळालेले आंध्रप्रदेशचे मोक्का विजयकुमार एकमेव असल्याचा दावा‎

श्रद्धेपोटी देश व जगभरातून दररोज असंख्य भाविक साई दरबारी येतात. महत्त्वाच्या उत्सव काळात तर सढळ हाताने दान देण्याचे कार्य या साई भक्तांकडून केले जाते. पण विशाखापट्टणमच्या (आंध्र प्रदेश) येथील साई भक्त व कलाकार मोक्का विजयकुमार यांनी बाजरी, ज्वारी, पांढरे व काळे तीळ अशा भरड धान्यांचा कुशलतेने वापर करून अवघ्या अकरा दिवसांत साईबाबांचे सुंदर रूप साकारले. साईबाबांवरील भक्ती व्यक्त करण्यासाठी भक्त वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करतात. कुणी गाणी लिहितं, कुणी चित्रं काढतं, तर कुणी कलाकृती तयार करतं, अशाच एका आगळ्या-वेगळ्या कलाकृतीचं दर्शन सोमवारी शिर्डीत घडलं. मोक्का विजयकुमार यांनी भरड धान्यांचा वापर करून साकारलेलं साईबाबांचं आकर्षक चित्र श्री साई संस्थानच्या चरणी अर्पण केलं आहे. हे धान्यचित्र पाहताक्षणी भाविकांच्या मनात श्रद्धा आणि भक्तीभाव दाटून आल्याशिवाय राहत नाही. या कलाकृतीची अधिकृत सुपूर्तता श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी संस्थानच्या वतीने विजयकुमार यांचा सत्कार करून त्यांच्या कलेचं व भक्तीभावाचं कौतुक करण्यात आले. विजयकुमार यांच्यासाठी ही कलाकृती फक्त कलात्मक प्रयोग नव्हता, तर ती त्यांच्या खोल श्रद्धा आणि निस्सीम भक्तीची साक्ष होती. बालपणापासूनच चित्रकलेची आवड भारतीय रेल्वेत तंत्रज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या विजयकुमार यांना बालपणापासूनच चित्रकलेची आवड आहे. फावल्या वेळेत ते विविध धान्यांचा वापर करून कलाकृती साकारतात. विशेष म्हणजे, ते आपली चित्रं कोणत्याही मोबदल्याशिवाय मोफत तयार करतात. या अद्वितीय कला शैलीमुळे विजयकुमार यांना जगातील एकमेव धान्य चित्रकार म्हणून मान्यता मिळाल्याचा दावा त्यांनी केला.

Aug 5, 2025 - 16:53
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow