सप्ताहात उरलेल्या भाकरीचा ‘ते’ खातात ‘गोपाळकाला’:शंभराच्यावर संख्या असलेले कुटुंबातील सदस्य भाकरी गाेळा करुन त्याच्यावरच करतात गुजराण‎

दरवर्षी होणाऱ्या सद्गुरू गंगागिरी महाराज सप्ताहात मोठ्या प्रमाणावर भाकरी येतात व शिल्लकही राहतात. सप्ताहस्थळी स्वच्छता करून त्या बदल्यात या शिल्लक भाकरी गोळा करणे आणि उन्हात वाळवून त्या साठवणे आणि त्याच्यावरच गुजराण करण्याची शेकडो वर्षांची परंपरा आजही येवला तालुक्यातील सावरगाव (गोपाळवाडी) येथील एका कुटुंबाची सुरू आहे. पूर्वी भीषण पाणी टंचाई असायची. शेतीत काहीही पिकत नव्हते. म्हणून सप्ताहातील स्वच्छता केली जात होती.सप्ताह काळात उरलेल्या भाकरी गोळा करून त्याद्वारे पुढील दोन-तीन महिने पोटाची भूक भागवायची, अशी परंपरा ठाकरे कुटुंबाने सुरू केली. ही परंपरा आजोबा-पणजोबांच्या काळापासून आजही ते जपत आहेत. अलीकडच्या काळात दिवंगत सुंदराबाई ठाकरे यांनी ही जबाबदरी स्वीकारली होती. नंतर आता त्यांचे जावई सजन वाघ व फुलचंद ठाकरे हे वारसदार म्हणून ही जबाबदारी पार पाडत आहेत. शंभराच्यावर संख्या असलेले हे कुटुंब असून त्यात महिला, पुरुष व लहान मुले व मुली मिळून हे काम करतात. त्यांना वडिलोपार्जित प्रत्येकी ५ ते ७ एकर जमीन आहे. पाणी टंचाई व दुष्काळजन्य परिस्थिती यामुळे त्यांनी सरकारी अनुदानावर विहिरी खोदल्या आहेत. परंतु आपल्या आजी, आजोबा, पणजोबांची ही परंपरा खंडित होऊ नये, म्हणून ते वर्षानुवर्षे चालणार्‍या सद्गुरू योगीराज हरिनाम सप्ताहात स्वछता दूताद्वारे सेवा देत आहेत. यासाठी सप्ताह समिती सप्ताहापूर्वी आम्हाला भेटतात. बिदागी ठरविली जाते. तसेच आम्हाला ट्रकद्वारे ने-आण करून सप्ताहाच्या ठिकाणी आमच्या जेवणापासून चहा, दूध, साखर सप्ताह समिती पुरवते. सध्या शनिदेव गाव व सप्त कृषी मध्ये गोदावरी तीरी सुरू असलेल्या १७८ व्या गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहात हजारो भाविकांनी आणलेल्या ट्रकभर उरल्यानंतर उरलेल्या भाकरी गोळा करतो. त्या दोन दिवस कडक ठणठणीत उन्हात वाळवतो. त्यानंतर खलबत्यात कुटून त्याचा बारीक भुगा करतो, आणि साठवून ठेवतो. दररोज त्यास मसाला टाकून त्या खाण्यायोग्य बनवतो, असे कुटुंबातील सदस्यांनी सांगितले. अशी दिली जाते सेवा सप्ताहकाळात परिसरात साफ-सफाई करणे, लघुशंकेला ठरवून दिलेल्या परिसरात शिवाय इतरत्र कुणाला बसू न देणे,अंध अपंग भाविकांच्या सामानाचे रक्षण करणे, त्याचबरोबर या भाविकांना सेवा देणे आदी कामे ही मंडळी प्रामाणिकपणे करीत असतात. तसेच हातात बांबूची काठी घेऊन सप्ताह परिसरात ठरवून दिलेल्या जागेवर टेहाळणीचे काम हे करतात. सप्ताहकाळात त्यांचा दिनक्रम पहाटे ४ वाजता सुरू होतो.

Aug 5, 2025 - 16:53
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow