शाळेत जाणाऱ्या सहावीच्या विद्यार्थिनीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू:प्रार्थना सुरू असतानाच चक्कर येऊन कोसळली, नाशिकमधील घटनेने हळहळ

अभ्यासात हुशार अन् मनमिळाऊ स्वभावाची असलेल्या श्रेयाला मंगळवारी (दि.५) सकाळी तिच्या आईने दुचाकीवरून शाळेत सोडले, मम्मीला बाय बाय करीत हसत खेळत ती शाळेत पाेहाेचली. श्रेया वर्गात गेली, मात्र प्रार्थना सुरू असतानाच ती चक्कर येऊन पडली, शिक्षकांनी तत्काळ तिच्या छातीला पंपिंग केले. मात्र त्याआधीच श्रेया निघून गेली हाेती. नाशिकरोड येथील उत्सव मंगल कार्यालयाच्या पाठीमागे राहणारी श्रेया किरण कापडी (वय ११) ही इयत्ता सहावीत शिकत हाेती. पालक, शिक्षक आणि मैत्रिणी तिची काळजी घेत हाेते. त्यामुळे ती हसत खेळत शिक्षण घेत हाेती. मंगळवारी सकाळीही ती नेहमीप्रमाणे शाळेत गेली आणि प्रार्थनेवेळी ती जमिनीवर काेसळली. शिक्षकांनी प्राथमिक उपचार म्हणून तिच्या छातीवर पंपिंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र ते प्रयत्न अपुरे पडले. तिला तत्काळ जवळच्याच खासगी रुग्णालयात दाखल केले. डाॅक्टरांनी तिला तपासून मृत घाेषित केले. अतिशय हुशार आणि मनमिळाऊ असलेल्या श्रेयाला लहानपणापासूनच हृदयाचा त्रास हाेता. मात्र, तरी ती आपला त्रास फारसा जाणवू देत नसे. शाळेच्या उपक्रमांमध्ये सहभागी हाेण्याचा तिचा नेहमीच प्रयत्न असे. तिच्या अचानक जाण्याने मैत्रिणींना धक्का बसला असून शिक्षकांनाही अश्रू अनावर झाले हाेते. देशवंडी येथे अंत्यसंस्कार कापडी कुटुंब मूळचे सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथील असल्याने तेथेच तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. श्रेयाच्या पश्चात आई, वडील आणि दीड वर्षांची बहीण आहे. शाळेतच श्रेयाचा मृत्यू झाल्याने व्यवस्थापनाने तत्काळ श्रद्धांजली अर्पण करत अर्धा दिवसाने शाळा साेडून देण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणी सरकारी रुग्णालयांतून आम्हाला एमएलसी आली असती तर आम्ही तत्काळ चाैकशी केली असती. मात्र आमच्याकडे असे काहीही प्राप्त झालेले नाही. तरीही या प्रकरणाची आम्ही पूर्णत: चाैकशी करणार आहाेत. - जयंत शिरसाठ, पोलीस निरीक्षक, उपनगर पाेलीस ठाणे

Aug 6, 2025 - 14:36
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow