आपलाच बॉल, आपलीच बॅट आणि आपणच सिक्सर मारणार!:डॉ. खेवलकर प्रकरणात महिला आयोगाच्या पत्रावरून रोहिणी खडसेंचे प्रश्नचिन्ह
माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे पती डॉ. प्रांजल मनीष खेवलकर हा खराडी येथील एका हॉटेल स्टेबर्डमध्ये 27 जुलै रोजी ड्रग्ज आणि मद्य पार्टी करताना आढळला होता. या प्रकरणी महिला आयोगाने पुणे पोलिस आयुक्तांना पत्र लिहिले आहे. या पत्रावरून रोहिणी खडसे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ. प्रांजल मनीष खेवलकर हा पुण्यासह विविध ठिकाणी क्रिकेट सट्टेबाज आणि सिगारेट व्यावसायिक निखिल पोपटानी (रा. पुणे) आणि इतर महिलांसोबत पार्टी करत होता. गोवा, साकीनाका आणि लोणावळ्यातील फार्महाऊसवरही त्याने पार्ट्या केल्या. स्टेबर्डमध्ये 2014 आणि 2015 या वर्षांत डॉ. खेवलकरने 20 वेळा रूम बुकिंग करून एकूण 43 दिवस तेथे वास्तव्य केले. विविध महिलांसोबत पार्टी केल्याचे रेकॉर्डही पोलिसांना मिळाले आहे. गेल्या दीड वर्षात प्रत्येक सुट्टीच्या दिवशी पार्टीसाठी तो विविध ठिकाणी भटकंती करत असल्याचेही चौकशीत निष्पन्न झाले आहे. राज्य महिला आयोगाकडून चौकशीचे निर्देश या प्रकरणी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाला सानवी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्याकडून तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे. त्यात म्हटले आहे की, ज्या रेव्ह पार्टीवर छापा टाकण्यात आला, त्यातील आरोपी डॉ. प्रांजल खेवलकर यांनी 28 वेळा स्वतःच्या नावाने हॉटेल रूम बुक करून अनेक वेळा परप्रांतीय मुलींना आमिष दाखवून बोलावले होते. हे एक रॅकेट असल्याचे दिसत आहे. आयोगाने पोलिस आयुक्त, पुणे यांना या प्रकरणाची मानवी तस्करीविरोधी पथक आणि सायबर विभागामार्फत तातडीने चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. महिला आयोग अध्यक्षांना अचानक कर्तव्य आठवले? - रोहिणी खडसे या संदर्भात रोहिणी खडसे यांनी तिन मुद्दे उपस्थित केले आहेत. ते खालील प्रमाणे - नुकतेच माध्यमांतून महिला आयोगाने डॉ. खेवलकर यांच्या प्रकरणात पुणे पोलीस आयुक्तांना दिलेले पत्र वाचले. मुद्दा क्र. 1 ज्या सानवी बहुद्देशीय सेवाभावी संस्थेने या प्रकरणात राज्य महिला आयोगात तक्रार दाखल केली आहे. ती संस्था राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला विभागाच्या बीड जिल्ह्याची अध्यक्षा प्रज्ञा खोसरे यांची आहे. मुद्दा क्र. 2 राज्यात महिलांच्या विरोधात इतके प्रकरण घडले, वैष्णवी हागवणे आत्महत्या प्रकरणासारखे हुंडाबळीचे प्रकरण घडले. यात खुद्द अजित पवार गटाच्या पुण्यातील महत्त्वाचे पदाधिकारी आरोपी आहेत. तेव्हा ही संस्था कुठे होती ? राज्यात महिलांवर इतके अत्याचार होतात तेव्हा ही संस्था कुठे होती ? मग आताच ही संस्था बाहेर कशी काढली गेली ? मुद्दा क्र. 3 राज्यातील अत्याचारग्रस्त महिलांची साधी विचारपूसही न करणाऱ्याला महिला आयोग अध्यक्षांना आज अचानक कसे कर्तव्य आठवले ? इतके कसे कार्यतत्पर झाले ? आपलाच बॉल, आपलीच बॅट आणि आपणच सिक्सर मारणार ! सगळं व्यवस्थित स्क्रीप्टनुसार सुरू आहे...

What's Your Reaction?






