माढ्यातील कुरेशी समाजाच्या मोर्चामध्येकाँग्रेस, संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते सहभागी:गोरक्षक संकल्पना तातडीने बंद करावी, सर्वच गोशाळांची चौकशी करावी
माढा गोरक्षक संकल्पना तातडीने बंद करून गोशाळेत नेलेली जनावरे पुढे जातात कुठे? सर्वच गोशाळांची चौकशी करा, असा सवाल कुरेशी समाजाने उपस्थित केले. माढ्यातील कुरेशी समाजाच्या वतीने कुरेशी समाजावर होत असलेल्या अन्यायाप्रश्नी सोमवारी सकाळी मूक मोर्चा काढण्यात आला. मशिद ते छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे माढा तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभरात कुरेशी समाजाने पशुधन खरेदी विक्रीचा व्यवसाय बंद ठेवून मूक मोर्चा काढला. त्याचाच एक भाग म्हणून माढा तहसीलवर कुरेशी समाजाकडून मोर्चा काढण्यात आला. तथाकथित गोरक्षकांच्या दडपशाहीमुळे पशुपालन व कुरशी समाजावर अन्याय होत आला असून, त्यांच्या हक्काचे व माढा तहसील कार्यालयावर कुरेशी समाजाने विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला. पकडलेली जनावरे गोशाळेत दिली जातात. गोशाळेतून ती जनावरे पुढे कुठे? जातात याची माहिती समोर यायला हवी. गोरक्षक असल्याची बतावणी करून अनेक जण आर्थिक देवाणघेवाणीची मागणी करतात. गोरक्षक ही संकल्पनाच तातडीने बंद करून गोशाळेत नेलेली जनावरे पुढे जातात कुठे? सर्वच गोशाळांची चौकशी करावी कुरेशी समाजाने ही मागणी केलीय. संविधानाने दिलेल्या अधिकाराचे उल्लंघन होत आहे. गोरक्षक व बजरंग दलाच्या नावाखाली काही लोक ८ ते १० जणांचा ग्रुप बनवून रस्त्यावर थांबून कुरेशी समाजाच्या गाड्या अडवून गाडीच्या चालकाला बेदम मारहाण करतात. त्यात काही जणांना अपंगत्व आलेले आहे. मारहाण करून पैशाची मागणी केली जाते. कुरेशी समाजातील नागरिकांना याचा फार मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागतोय. या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शासनाने लक्ष घालून कुरेशी समाज बांधवांवर अन्याय थांबवावा, अशा मागणीचे निवेदन तहसील प्रशासनाला देण्यात आले. काँग्रेसचे जहीर मणेर, इसाक कुरेशी, संभाजी ब्रिगेडचे दिनेश जगदाळे, वेदांत साठे, सुधीर लंकेश्वर आदींनी कुरेशी समाजाच्या मागण्यांप्रश्नी भूमिका मांडली. मोर्चात सर्वपक्षीय नेते सहभागी होते.

What's Your Reaction?






