अभंग, ठुमरी अन् गझलच्या त्रिवेणी संगमात श्रोते न्हाले:पंढरपुरात नादब्रह्म कला फाउंडेशन करकंब अन् आरती मनमाडकर परिवाराची संगीत मैफल‎

गणेश वंदनेने सुरेल मैफलीस सुुरुवात झाली.. पंढरीसी जारे आल्यानो संसारा... धन्य आजी दिन संत दर्शनाचा... या अभंग गायनाने गायत्री गायकवाड यांनी मैफलीत प्रारंभीच भक्तीचे रंग भरले. याबरोबरच भाव-भक्तीच्या एकापेक्षा एक सरस गीतांनी मैफलीची रंगत उत्तरोत्तर वाढत गेली. मध्यंतरात चार वर्षांच्या स्मरणिकाने गोड आवाजात गायलेल्या चुपके चुपके रात दिन... या गझलेने उपस्थितांना भावविभोर केले. ऐसी लागी लगन.. या गझलेने मैफल टिपेला पोहोचली.. गायत्री यांची लेक असलेल्या चिमुकल्या स्मरणिकाच्या गायन ऐकून श्रोते अवाक् झाले. त्यानंतर काश जसा कोई मंजर, हमारी अटलिया पे, ये महोब्बत तेरे अंजाम पे अशा एकापेक्षा एक सरस गझल ठुमरी गात गायली. त्यांना व्हायोलिनवर केदार गुळवणी, सिंथेसायझरवर नामदेव सुतार यांनी साथसंगत केली. तर पखवाजावर ज्ञानेश्वर दुधाणे साथीला होते. टाळावर वैभव केंगार यांनी साथसंगत केली. पांडुरंग पवार यांच्या तबल्याच्या साथीने चार चाँद लावले. पांडुरंग पवारांच्या तबल्याच्या ठेक्याने रसिकांच्या हृदयाचा ठाव घेतला. अभंग, ठुमरी, गझलच्या त्रिवेणी संगमात श्रोते न्हावून निघाले. अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी श्री क्षेत्र पंढरपूर येथे करकंबच्या नादब्रह्म कला फाउंडेशन आणि आरती स्पीकर मनमाडकर परिवाराच्या वतीने खास रसिक श्रोत्यांच्या आग्रहाखातर सुरेल मैफलीचे आयोजन केले होते. विठूरायाच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन गायत्री गायकवाड- गुल्हाणे पांडुरंग पवार, केदार गुळवणी, शिवाजी सुतार, भगवान मनमाडकर, शुभांगीताई मनमाडकर यांच्या हस्ते झाले. पंढरीत आयोजित अभंग ठुमरी गझल गायनाच्या कार्यक्रमात गायत्री गायकवाड यांनी आपल्या सुरेल गायकीने मंत्रमुग्ध केले. त्यांच्याबरोबर त्यांची चार वर्षांची कन्या स्मरणिका हिने आपल्या लहान वयातही प्रगल्भ गायन केले. तिने गायलेल्या गीताला उपस्थित श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. तिने अविट गोडीची गीतं सादर करून उपस्थितांची मनं जिंकली. चिमुकलीची गीतं ऐकून श्रोते अवाक् झाले होते. अभिषेकी संगीत महोत्सव आणि त्रैमासिक संगीत मैफल आयोजनामागचा उद्देश सांगत ज्ञानेश्वर दुधाणे यांनी रसिक मायबाप श्रोत्यांनी आतापर्यंत ज्या पद्धतीने उदंड प्रतिसाद दिला तो असाच राहावा, असे आवाहन केले. आरती मनमाडकर यांनी सूत्रसंचालन केले. शुभांगीताई मनमाडकर यांनी आभार मानले. या वेळी पंढरपूर आणि पंचक्रोशीतील कलासाधक आणि कलारसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अविस्मरणीय संगीत मैफलीचा आनंद घेतला.

Aug 6, 2025 - 14:36
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow