राष्ट्रीय अबॅकस स्पर्धा गुणवंतांना घडवणारी:विद्यार्थ्यांनी साधली विक्रमी वेळेत असंख्य गणिते सोडवण्याची किमया
"सध्याचे माहिती व तंत्रज्ञानाची युग आहे.काळासह चालणारा विद्यार्थी स्वतःला अद्ययावत करू शकतो.अबॅकससारख्या कमी वेळेत गणिते सोडवण्याच्या पद्धतीमुळे मुलांचा मानसिक विकास होण्याबरोबर त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढत आहे.हजारो मुलांची पाच मिनिटांची ही राष्ट्रीय स्पर्धा गुणवंतांना घडवणारी वैशिष्ट्यपूर्ण स्पर्धा आहे, असे प्रतिपादन न्यायाधीश श्रीमती शेख यांनी केले. ३६ व्या राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी दिवाणी न्यायालय, पारनेरच्या न्यायाधीश शेख बोलत होत्या.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून परभणीचे अप्पर पोलिस अधीक्षक सुरज गुंजाळ (अप्पर पोलिस अधीक्षक -परभणी),प्राचार्या सीमा सुदामे,मोनाली पठारे उपस्थित होते. शिक्षिका कळमकर यांनी सर्वांसमोर विद्यार्थ्यांच्या मदतीने अबॅकसचा डेमो सादर केला.विद्यार्थ्यांनी सादर केलेले अबॅकसचे प्रात्यक्षिक पाहून न्यायाधीश महोदय भारावून गेले.विद्यार्थी व शिक्षिकांना प्रश्न विचारून त्यांनी अबॅकसची अधिक माहिती घेतली.मान्यवरांच्या शुभहस्ते "माय एव्हरेस्ट-माय अबॅकस" या वैशिष्ट्यपूर्ण सेल्फी पॉईंटचे उद्घाटन झाले. अप्पर पोलिस अधीक्षक गुंजाळ यांनी नमूद केले की "राष्ट्र स्तरीय स्पर्धा परीक्षांसाठी गणित महत्त्वाचे असते आणि आज विद्यार्थ्यांचे अबॅकस कौशल्य बघून असे वाटते की भविष्यात भारतीय विद्यार्थ्याला हिशोबासाठी कॅल्क्युलेटर वापरावाच लागणार नाही."अकॅडमीचे ब्रँड अँबेसिडर असलेल्या तीनही सिने बालकलाकारांनी विविध प्रसंग सादर करून विद्यार्थ्यांचे व उपस्थितांचे मनोरंजन केले.अबॅकस स्पर्धेमध्ये सुमारे १००० विद्यार्थी सहभागी झाले होते.सुमारे ३५० विद्यार्थ्यांना विविध गटांमध्ये मान्यवरांच्या शुभहस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमावर आधारित छावा हा चित्रपट दाखवण्यात आला.

What's Your Reaction?






