जंक फूडमुळे चरबी वाढून विद्यार्थी दशेतच होतो हृदय रोग:प्राचार्य अजय भंडारी यांचे प्रतिपादन, गोड पदार्थ व शीतपेयांचे सेवन आरोग्यास हानिकारक‎

मोबाइल, टीव्ही, संगणक अशा आधुनिक साधनांना सर्वप्रथम विद्यार्थी बळी पडत आहे. येणाऱ्या काळात शाळकरी मुलांमध्ये विविध प्रकारचे आजार बळावून तंदुरुस्त विद्यार्थी शाळेत अभावाने सापडणार आहे. व्यायामाचा अभाव असल्याने स्थूलतेचे सुद्धा प्रमाण विद्यार्थ्यांमध्ये वाढत आहे. चॉकलेट, बिस्किट, जंक फूड यामुळे चरबीचे प्रमाण वाढवून हृदय रोगाची पायाभरणी विद्यार्थी दशेतच होते.,असे प्रतिपादन प्राचार्य अजय भंडारी यांनी व्यक्त केले. श्रीतिलोक जैन विद्यालयाच्या आवारात जिल्हा परिषद व पंचायत समिती शिक्षण विभाग व शाळेच्या संयुक्त विद्यमाने दृष्टीदोष असलेल्या शाळेतील एकूण ९२ विद्यार्थ्यांना चष्म्यांचे मोफत वाटप करण्यात आले. याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड, शिक्षण विस्तार अधिकारी रामनाथ कराड, उपप्राचार्य अशोक गर्जे, पर्यवेक्षक भारत गाडेकर व मनीषा मिसाळ, शिक्षण विभागाचे रवींद्र डाळिंबकर, महेंद्र राजगुरू उपस्थित होते. तालुक्यातील ६ ते १४ वयोगटातील एकूण २५३ विद्यार्थ्यांना चष्म्यांचे वाटप करण्यात आले. समग्र शिक्षा अंतर्गत समावेशित शिक्षण व शिक्षण धोरण २०२० उपक्रम अंतर्गत साहित्य वाटप करण्यात आले. याच वयोगटातील विद्यार्थ्यांना अगदी दिव्यांगांना सुद्धा विविध साहित्याचे वाटप, तीन चाकी सायकल, श्रवणयंत्र, कॅलिपर, ब्रेल बुक, लार्ज प्रिंट पुस्तके, मोफत दिली जातात. विद्यार्थ्यांनी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना याबाबत मागणी करावी, असे शिक्षण विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले. प्राचार्य भंडारी म्हणाले, अलीकडील काळात शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये फास्ट फूड, बेकरी पदार्थ, अथवा हॉटेलमधील पदार्थ अधिक प्रमाणात सेवन करण्याची पद्धत वाढली आहे. बहुतेक पदार्थांत अजिनोमोटो म्हणजे टेस्टिंग पावडर मिसळली जाते ही आरोग्यास हानिकारक आहे. आतड्यांना गंभीर हानी पोहोचवते. पालकांनाही याचे गांभीर्य नाही. शालेय वेळेत अधूनमधून विद्यार्थ्यांचे जेवणाचे डबे सुद्धा तपासले जावेत. तज्ञांचे बाहेरील खाद्यपदार्थ खाऊन होणारे दुष्परिणाम, शरीरामध्ये जाणारी अतिरिक्त साखर, शीतपेय, आईस्क्रीम, चॉकलेट यापासून होणारे दुष्परिणाम याची माहिती शाळेच्या दर्शनी भागावर लावून आरोग्य फलक योजना जैन विद्यालयात अमलात आणली जाईल. प्रास्ताविक विवेक सातपुते यांनी, तर आभार वृषाली कर्नावट यांनी मानले. विद्यार्थ्यांच्या मागणीप्रमाणे पदार्थ घरी करून द्या पालकांनी विद्यार्थ्यांच्या मागणीप्रमाणे पदार्थ घरी करून द्यावेत. हवाबंद अन्न करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अतिरिक्त मीठ व अन्य रासायनिक पदार्थांमुळे विद्यार्थ्यांच्या पचनशक्तीवर परिणाम होतो. भूक नसतानाही पोटभर जेवण्याचा पालकांकडून आग्रह होतो. आपला मुलगा घरचे पदार्थ खात नाही म्हणून त्याला बाहेरील पदार्थ आणून त्याचे पोट भरण्यासाठी लाड पुरविले जातात. हेच लाड पाच दहा वर्षांत विविध रुग्णालयांकडे कुटुंबाचे पाय वळवतात, असे प्राचार्य भंडारी यावेळी म्हणाले.

Aug 6, 2025 - 14:36
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow