बल्लाडीवासीयांनी नागरी सुविधेसाठी दिले निवेदन

वाडेगाव येथून जवळच असलेले दुर्गम भागातील बल्हाडी हा गाव अकोला- बुलडाणा जिल्ह्याच्या सीमेवर येत असून, ७०० लोकसंख्या असलेले गावात विविध नागरी सुविधांसून वंचित असल्याने सर्व ग्रामस्थानी मंगळवार, ५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन निवेदन देण्यात आले आहे. ग्रामपंचायत चिंचोली गणू अंतर्गत गट ग्रामपंचायत म्हणून बल्हाडी गावाचा कारभार पहिला जातो. परंतु शासन स्तरावरून नागरिकांच्या नागरी सुविधा उपलब्ध करण्यासाठी मोठ्या प्रमाणात विविध योजनेच्या माध्यमातून निधी उपलब्ध केला जातो. त्या अनुषंगाने इतर गावात योजनेच्या माध्यमातून नागरी सुविधा उपलब्ध केले जातात. परंतु इतर गावांच्या तुलनेत बल्हाडी गावामध्ये कुठली नागरी सुविधा दिल्या जात नाही. सध्याच्या परिस्थितीत गावातील घरातील सांडपाण्याची योग्य विल्हेवाट आभावी घाण पाणी रस्त्यावर वाहताना दिसते. तसेच गावातील रस्त्यांची प्रचंड प्रमाणात दुरवस्था असून, पावसाळी दिवस असल्याने रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्याचप्रमाणे गावात ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव प्रचंड वाढत आहे. त्यामुळे लहान मुला आबालवृद्ध यांचे आरोग्य धोक्यात असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु मागण्यांकडे संबंधित प्रशासनाचा केवळ दुर्लक्षितपणा असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे बल्हाडी या गावातील विविध गंभीर समस्येकडे लक्ष देऊन बल्हाडी गाववासीयांना सुविधा देण्यात याव्यात, अशी मागणी अजय बाबर, लखन चव्हाण, सुनील माळवे, रतन चव्हाण, पंजाब शिंदे, भगत शिंदे यांनी केली.

Aug 7, 2025 - 11:47
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow