‘जायकवाडी’ला पाच हजार पर्यटकांची भेट:अनेकांनी साधली संडेची पर्वणी, व्यापारी वर्गासाठी आता दिवाळीच, पैठणनगरीकडे येणारे रस्ते फुलले
प्रतिनिधी | पैठण जायकवाडी धरणाच्या मुख्य गेटमधून पाण्याचा विसर्ग सुरू असून पाणीसाठा ९१.३० टक्क्यांवर आहे. रविवारी (दि. ३) सुटीमुळे धरणावर पर्यटकांची मोठी गर्दी वाढली होती. दिवसभरात जवळपास ५ हजार पर्यटकांनी ‘जायकवाडी’ला भेट दिली. पैठण शहराला तसा प्राचीन व ऐतिहासिक वारसा आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेले संत ज्ञानेश्वर उद्यान काही दिवसांपूर्वीच सुरू झाले आहे. अशात आता जायकवाडी धरणात ९० टक्क्यांहून अधिक साठा झाला आहे. धरणात दोन दिवसांत आवक घटल्याने शनिवारी विसर्ग कमी करून ८ गेट्समधून पाणी गोदावरी सोडले जात होते. तर, रविवारी सायंकाळी पुन्हा ६गेट्स बंद करुन आता केवळ २ गेट्समधून १ हजार ४८ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. धरणावर पर्यटक वाढल्याने व्यवसाय वाढला असून, आता धरणावर रोषणाई करण्यात यावी, अशी मागणी व्यापारी महासंंघाचे माजी अध्यक्ष पवन लोहिया यांनी केली आहे.

What's Your Reaction?






