हल्ला करणारा प्राणी तरस असावा:बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला, नऊ शेळ्या ठार, घोटीतील घटना, शेतकऱ्यांत भीती
माढा तालुक्यातील घोटी गावात बिबट्यासदृश वस्तीवर गोठ्यात बांधलेल्या शेळ्यांच्या नरड्याला चावा घेऊन केलेल्या हल्ल्यात नऊ शेळ्यांचा मृत्यु झाला आहे. माढा तालुक्यातील आतापर्यंतचा हा सर्वात मोठा हल्ला असल्याने परिसरात पशुपालकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना बुधवारी पहाटे तीन ते चार चे सुमारास घडली. माढा तालुक्यात मागील तीन महिन्यांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून दररोज एखाद्या गावात पाळीव प्राण्यांवर हल्ला करून जनावरे मारण्याच्या घटना घडत आहेत. बुधवारी उद्धव यादव (रा.घोटी ता. माढा ) यांचे पाण्याचे टाकीजवळ असलेल्या वस्तीवरील गोट्यात एकूण ३४ शेळ्या होत्या. बिबट्याने पहाटे तीन ते चार च्या सुमारास या गोठ्यावर बिबट्याने हल्ला चढवला यामध्ये नऊ शेळ्यांचा नरडे फोडून काढले. हल्ला केलेनंतर शेळ्यांच्या कालव्याने उद्धव यादव हे उठले होते.त्यावेळेस पाऊस पडत असल्याने लाईट गेलेली होती.या दोन प्राणी गेलेचे त्यांनी सांगितले. या हल्ल्याने परिसरातील पशुपालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. हल्ल्यानंतर बुधवारी रात्री उशीरापर्यंत वन विभागाचे कोणीही फिरकले नसल्याने जाधव यांनी सांगितले. ^ माढा तालुक्यातील घोटी गावात शेळ्यावर केलेला हल्ला हा तरस या प्राण्याने केल्याचा अंदाज आहे. ठस्से आणि हल्ला करण्याची पध्दत बिबट्यासारखी दिसत नाही. हल्ल्याच्या घटनेनंतर बुधवारी दिवसभरात उंदरगाव आणि व्होळे उजनी या गावात हल्ल्याचे घटनांची पाहणी व जनजागृती करण्यासाठी उपस्थित असल्यामुळे भेट देण्यासाठी वेळ लागला. शुभम धायतडक, वनरक्षक

What's Your Reaction?






