जवखेडेसीम येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा:कासोदा पोलिसांची कारवाई, 15 जणांवर गुन्हा दाखल, दोन दुचाकींसह दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
जिल्हा पोलिस अधीक्षक माहेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार अवैध धंद्यांविरोधात वॉशआऊट मोहिमेंतर्गत कासोदा पोलिस स्टेशनची कारवाई सुरुच असून पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या जवखेडेसिम ता.एरंडोल येथील जुगार अड्ड्यावर १५ जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून दुचाकींसह एकूण १ लाख २१ हजार ३९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जवखेडेसिम येथे गालापूर रस्त्यालगत काटेरी झुडपांच्या आडोशाला काही जण पत्ते खेळत असल्याची माहिती कासोदा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश राजपूत यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथक पाठवले असता या ठिकाणी सोनू धाकू भिल, विरभान श्रावण भिल, राहूल संतोष सोनवणे, प्रवीण वसंत सोनवणे, संतोष माधव सोनवणे, सुनिल दगा ठाकरे, मंगीलाल भाईदास चव्हाण, रतन धाकू भिल, अशोक गोविंदा पाटील, सचिन बापू पवार, कांतीलाल महादू सोनवणे, उत्तम बालाप्पा जेढे, समाधान बापू पाटील, संभाजी महारु पाटील, सुनील सिताराम वाघ सर्व रा. जवखेडेसिम हे सर्व जमिनीवर पैसे टाकून पत्ते खेळत असल्याचे आढळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ६३९० रुपये रोख व १ लाख १५ हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी असा एकूण १ लाख २१ हजार ३९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई ५ रोजी दुपारी ३ वाजता करण्यात आली. ही कारवाई हवालदार नंदलाल परदेशी, निलेश गायकवाड, समाधान तोंडे, प्रदीप पाटील, योगेश पाटील, कुणाल देवरे, लहू हटकर, दिपक देसले केली. याप्रकरणी हवालदार दिपक देसले यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला.

What's Your Reaction?






