निफाड येथे अज्ञात व्यक्तीने जाळला चाळीमधील 700 क्विंटल कांदा:शेतकऱ्याचे 7 लाख रुपयांचे नुकसान
निफाड येथील कांदा उत्पादक शेतकरी गोपाळराव संपत गाजरे यांनी पाच लाख रुपये खर्च करत साडेचार एकर शेतामध्ये उन्हाळ कांद्याचे पीक घेतले होते. मात्र त्यावेळी कांद्याला बाजार भाव नसल्याने शेतामध्ये चाळ बांधत त्यामध्ये ७०० क्विंटल कांदा साठवला होता. मात्र रविवारी पहाटे अज्ञात व्यक्तींने कांद्याची साठवलेली चाळच जाळून टाकल्याने आर्थिक नुकसान झाले आहे. गोपाळराव गाजरे यांनी मोठ्या कष्टाने कांदा लागवड करून तो पिकवला होता. चाळीत साठवणूक केलेला कांदा अज्ञात व्यक्तीने जाळून टाकल्याने कुटुंबाचे उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण, मुलीचे लग्न व सोसायटीचे १२ लाख रुपयांचे कर्ज फेडावे कसे मोठा प्रश्न उभा राहिला आहे. या प्रकरणी निफाड पोलीसांत तक्रार देण्यात आली असून व्यक्तीचा शोध घेत संबंधितावर कठोर कारवाई करावी तसेच शासनाने कर्ज माफ करावे किंवा भरघोस मदत करावी, अशी मागणी शेतकरी करत आहे

What's Your Reaction?






