भाजपच्या पदाधिकाऱ्याला मारहाण; पाच जणांवर गुन्हा:जामनेर शहरातील पोलिस स्टेशनसमोरच झाला वाद
येथे पोलिस ठाण्यासमोरच भाजप पदाधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली. मुलीच्या छेडखानी प्रकरणावरून हा वाद झाला. याप्रकरणी एका विरुद्ध पोस्को कायद्याअंतर्गत तसेच अन्य पाच जणांविरुद्ध मारहाण व दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जामनेर शहरातील अनिकेत कडू गोपाळ हा एका अल्पवयीन मुलीला फोनवरून व प्रत्यक्ष भेटून त्रास देत होता. याबाबत मुलीने कुटुंबीयांना माहिती दिली. त्रास का देतो अशी विचारणा करावयास गेलेले मुलीचे काका तथा भाजपचे पदाधिकारी नवलसिंग पाटील यांना मुलाच्या नातेवाईक व मित्रांनी मिळून पोलिस ठाण्यासमोरच मारहाण केली. मंगळवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडलेल्या या प्रकाराबाबत माहिती मिळताच भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मदतीसाठी पोलिस ठाण्याकडे धाव घेतली. पहाटे चार वाजेपर्यंत गदारोळ मुलीला छेडण्याच्या कारणावरून आरोपी अनिकेत गवळी यास पोलिस ठाण्यात आणून पोलीस निरीक्षक मधुकर कासार यांनी त्याचा मोबाईल तपासला. त्यात मुली सोबत केलेले चॅटिंग व तिने ब्लॉक केल्यानंतर दिलेल्या धमक्या पाहता कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला. या विषयामुळे शहरातील काही लॉज व कॅफे सेंटरवर अश्लील चाळे चालतात असा विषय समोर आला. अशा लॉज व कॅफे सेंटरवर कारवाईसाठी पदाधिकाऱ्यांनी अडचण आणू नये. असे पोलिस निरीक्षक मधुकर कासार यांनी यावेळी सांगितले.

What's Your Reaction?






