कुशावर्तावर 15000 भाविकांचे तिर्थ स्नान व सद‌्गुरु पाद्यपूजन सोहळा

जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे श्रावण महिना व नागपंचमीनिमित्त जपानुष्ठान सोहळ्याची नुकतीच सांगता झाली. या सोहळ्यात रोज पहाटे ब्रह्ममुहूर्तावर नित्यनियम विधी, ध्यान, प्राणायाम, भागवत वाचन, प्रवचन, सत्संग, हस्तलिखित नामजप साधना, अखंड नंदादीप, श्रमदान यांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात होते. प्रारंभी त्र्यंबकेश्वर परिसरातून पालखी मिरवणूक पार पडली. कुशावर्त येथे स्नान व सदगुरु पाद्यपूजन सोहळा पार पडला. यानंतर स्वामी शांतिगिरी महाराज यांनी उपदेश केला. भक्त परिवाराच्या वतीने आगामी काळात आयोजित विविध धर्म सोहळ्याची माहिती यावेळी प्रवक्ते विवेकानंद महाराज यांनी दिली. महाआरती, महाप्रसाद वाटप करून या धर्म सोहळ्याची सांगता झाली. मातोश्री म्हाळसा माता पुण्यतिथी सोहळ्याचे ९ ऑगस्ट रोजी ध्वजारोहण जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने ओझर येथे सप्टेंबर २०२५ मध्ये मातोश्री म्हाळसामाता व मातोश्री फुला माता यांच्या पुण्यतिथी सोहळा होणार आहे. या सोहळ्या दरम्यान हजारोंच्या संखेने महिला जपानुष्ठान सोहळ्यात सहभागी होणार आहे. या सोहळ्याचे ध्वजारोहण ओझर येथे दि. ९ ऑगस्ट रोजी होणार असल्याची घोषणा त्र्यंबकेश्वर येथे आयोजित जपानुष्ठान सोहळ्याच्या सांगते प्रसंगी करण्यात आली.

Aug 7, 2025 - 11:47
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow