परराष्ट्र धोरण विदेश दौरे काढण्यापुरतेच आहे का?:आदित्य ठाकरेंचा मोदी सरकारवर निशाणा; ‘तारीफ’पासून ‘टॅरिफ’पर्यंतचा प्रवास आता 50% पर्यंत पोहोचलाय

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणावरुन नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली आहे. तारीफ’पासून ‘टॅरिफ’पर्यंतचा प्रवास आता 50% पर्यंत पोहोचला असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. या यामाध्यमातून त्यांनी देशाच्या परराष्ट्र निती वर बोट ठेवले आहे. या संदर्भातील ठाकरे यांनी सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र धोरणातील नितीवर टीका केली आहे. यामध्ये त्यांनी बांगलादेश आणि पाकिस्तान सोबत होत असलेल्या क्रिकेट सामन्यांवरून देखील सरकारवर टीका केली. इतकाच नाही तर आधी चिनी वस्तूवर बहिष्कार टाकण्याची मागणी करणारे नरेंद्र मोदी देखील आता चीनला जात आहेत. यावरून देखील आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे. सध्या उद्योग आणि लघुउद्योग अडचणीत आहेत. मात्र केंद्र सरकारमधील कोणताही मंत्री या विषयावर बोलत नाही. व्यापार करारावर कोणतीच स्पष्टता नसल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे आदित्य ठाकरे यांनी केलेली पोस्ट देखील पहा.... मग आता चीन दौरा कशासाठी? गलवान घडलं की नाही? त्यांनी आपल्या हद्दीत अतिक्रमण केलं की नाही? आपल्या देशाचं परराष्ट्र धोरण विदेश दौरे काढण्यापुरतेच आहे का?

Aug 8, 2025 - 07:09
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow