थिलोरी गावात वीज पुरवठा खंडित:दर्यापूर महावितरण कार्यालयावर ग्रामस्थांचे आंदोलन, निवेदन दाखल
दर्यापूर तालुक्यातील थिलोरी गावात सतत खंडित होतो. मागील एक ते दीड वर्षापासून कुठल्या ना कुठल्या किरकोळ कारणाने वीज पुरवठा थांबविला जातो. या समस्येबाबत मागील वर्षीसुद्धा निवेदन देण्यात आले होते. परंतु कुठलीच उपाययोजना झाली नाही. त्यामुळे थिलोरीचे ग्रामस्थ हे आक्रमक झाले असून त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. दोन दिवसांपूर्वी ते उपकार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्याकरिता गेले. परंतु अधिकारीच उपस्थित नसल्यामुळे त्यांना वस्तुस्थिती कळू शकली नाहीय सद्यःस्थितीत वारंवार वीज पुरवठा खंडित होत असून संपूर्ण उन्हाळाभर दुरुस्तीच्या नावाने दिवसभर वीज पुरवठा बंद केला जात आहे. मागील वर्षीच्या अनुभवानुसार ऐन पावसाळ्याच्या सुरुवातीला थो़डीफार हवा व पावसाने रात्रभर वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे उन्हाळाभर काय दुरुस्ती केली हा प्रश्न निर्माण होत आहे. रात्रीच्या वेळी अंधारात साप, विंचू निघत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा व सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळेच ग्रामस्थांच्या निवेदनाची दखल घेऊन योग्य उपाययोजना करावी अन्यथा तीव्र आंदोलन उभे करण्याचा इशारा थिलोरीच्या ग्रामस्थांनी निवेदन दिला आहे. यावेळी अमित होले, उपसरपंच गौतम वाकपांजर, प्रमोद पाटील होले, अनिकेत वाकपांजर, संदीप धर्माळे, गजानन गुल्हाने, नागेश होले, प्रा.अनिरुद्ध होले, नारायण वानखडे, प्रदीप होले, प्रवीण दाळू आदी उपस्थित होते.

What's Your Reaction?






