रामदास कदम विधानभवनाच्या लॉबीमध्ये माझ्या पाया पडले:सहा महिन्यात आपण मंत्री नाहीतर विरोधी पक्षनेता होणार- भास्कर जाधव

30 वर्षे बार चालवणाऱ्या रामदास कदम यांना लाज वाटली पाहिजे. मी कधी त्यांच्या पाया पडलो नाही, पण ते विधानभवनाच्या लॉबीमध्ये माझ्या पाया पडलेत.रामदास नव्हे, बाम दास कदम... तो ठार येडा झाला आहे, असे म्हणत उबाठाचे नेते भास्कर जाधव यांनी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यावर टीका केली आहे. भास्कर जाधव म्हणाले की, भास्कर जाधव एकवेळ मरेल, पण तुमच्या पाया पडणार नाही,लवकरच आपले सरकार येणार असून, आपण मंत्री होणार, नाहीतर हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेता नक्की होणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. नेमके काय म्हणाले? भास्कर जाधव म्हणाले की, रामदास कदम हा वाघ नाही तर हा बिबट्या आहे. नागपूर अधिवेशनात एकदा ते मला भेटले. त्यावेळी रडायला लागले असे म्हणत त्यांनी कदम यांची नक्कल केली. शिवाय माझ्या योगेश दादाला सांभाळा म्हणून त्यांनी आपले पाय धरले असे ही भास्कर जाधव यावेळी म्हणाले. तू माझ्या पाया पडलास, मी तुझ्या पाया पडलो नाही असे थेट जाधव यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी त्यांच्या डान्सबार प्रकरणावर ही वक्तव्य केले. लाज वाटली पाहिजे तुम्हाला 30 वर्षे बार पत्नीच्या नावावर होता. ..गिरीचे पैसे कमावले असा हल्लाबोल त्यांनी केला. तुम्ही गृहराज्यमंत्री होतात तेव्हाही आणि आता मुलगा गृहराज्यमंत्री झाला तेव्हा बार बंद करावासा वाटला नाही असा टोलाही त्यांनी लगावला. दापोलीसाठी उमेदवार केला जाहीर रामदास कदम विरुद्ध भास्कर जाधव असा संघर्ष कोकणात उफाळून आला असून, मंत्री योगेश कदम यांचा गुहागर मतदारसंघातील हस्तक्षेपही भास्कर जाधव यांच्याच शब्दांत जिव्हारी लागला आहे. त्यामुळे त्यांनी भर सभेतच कुणबी समाजातील सहदेव बेटकर यांना उमेदवार म्हणून जाहीर केले. दापोलीत काम करा, आमदार म्हणून मान्यता मिळेल, असेही त्यांनी बेटकर यांना उद्देशून म्हटले आहे.जेवढा निधी आमदार म्हणून दापोलीमध्ये आणतो, त्यापेक्षा जास्त निधी आता गुहागरमध्ये देणार,असे ही त्यांनी म्हटले आहे. सहदेव बेटकर हे शिवसेना ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी भास्कर जाधवांच्या विरोधात निवडणूक लढवली आहे. ​​​​​​​ रामदास कदमांचे प्रत्युत्तर याआधी, गुहागरमध्ये झालेल्या एका पक्षप्रवेश कार्यक्रमात रामदास कदम यांनी भास्कर जाधव यांच्यावर टीका केली होती. योगेश कदम यांच्या कामामुळे काही लोकांचे पोट दुखत आहे आणि त्यामुळे ते त्यांचा राजीनामा मागत आहेत, असे म्हणत त्यांनी विरोधकांना लक्ष्य केले होते. या टीकेनंतर भास्कर जाधव यांनी हे जोरदार प्रत्युत्तर दिले.

Aug 8, 2025 - 07:09
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow