टेरिफची दहशत:प्रश्न... चीनवर व्यापार कर कमी का?ट्रम्प यांचे कुटिल उत्तर... इट्स ओके, रशियाकडून तेल खरेदीच्या नावाखाली कर लादण्यात अमेरिकेचे दुटप्पी धोरण
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर आणखी निर्बंध लादण्याची धमकी दिली. ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकारांशी बाेलताना ते म्हणाले, तुम्हाला बरेच काही पाहायला मिळेल. भारतावर आणखी निर्बंध लादले जातील. जेव्हा त्यांना विचारले की चीन रशियाकडूनही तेल खरेदी करत आहे, तर त्यावर अधिक कर का नाही? यावर ट्रम्प यांनी फक्त ‘ठीक आहे’ असे उत्तर दिले. रशिया-युक्रेनशी करार केला तर तुम्ही भारतावरील अतिरिक्त कर काढून टाकाल का? यावर ट्रम्प म्हणाले- ‘आम्ही हे नंतर ठरवू.’ दरम्यान, ब्रिक्स देश अमेरिकेच्या टेरिफविरुद्ध संयुक्त निवेदन जारी करू शकतात. ट्रम्पवर टीकेत आघाडीवर असलेले ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांनी गुरुवारी सांगितले की ते पंतप्रधान मोदी आणि इतर ब्रिक्स नेत्यांना फोन करण्याची योजना आखत आहेत. देशातील विक्री वाढवा, उत्पादनावर लक्ष केंद्रित करून खर्च कमी करा कर असेच वाढत राहिल्यास आपल्याला उपाय व पर्याय शोधावे लागतील. जगातील देश आपापल्या पद्धतीने स्पर्धा करत आहेत. भारत ही देशांतर्गत वापरावर आधारित अर्थव्यवस्था आहे. म्हणून आपल्याला देशांतर्गत विक्री वाढ व स्वदेशीवर भर द्यावा लागेल. उत्पादनाला चालना देण्यासाठी धोरण बनवावे लागेल. यामुळे खर्च कमी होईल. तरच आपण तैवान आणि व्हिएतनामसारख्या देशांशी स्पर्धा करू शकू. निर्यात-आधारित उद्योगांना अनुदान देण्याचा विचार करावा लागेल, जेणेकरून खर्च कमी करता येईल. काेणत्या देशांनी काेणती पावले उचलली... चीन: जागतिक आघाडीवर... रशिया, तुर्की आणि इतर आशियाई देशांशी व्यापारी संबंध मजबूत केले. रशिया-युक्रेन युद्धानंतर रशियाला दुहेरी वापराच्या वस्तूंचा पुरवठा वाढवला. इंडोनेशियामध्ये गुंतवणूक वाढवली. देशांतर्गत आघाडी... अर्थव्यवस्था विविधीकरणावर भर. देशांतर्गत तंत्रज्ञानावर, स्वावलंबनावर लक्ष केंद्रित. आमच्यासाठी आमचे शेतकरीच सर्वस्व पंतप्रधान म्हणाले, ‘आमच्यासाठी शेतकऱ्यांचे हित सर्वात महत्त्वाचे आहे. देश शेतकरी, पशुपालक, मच्छीमार यांच्या हिताशी कधीही तडजोड करणार नाही. मला माहीत आहे की मला वैयक्तिकरीत्या मोठी किंमत मोजावी लागेल. पण मी तयार आहे.’ दिव्य मराठी नेटवर्क, नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सांगितले की भारत शेतकरी, मच्छीमार व दुग्ध क्षेत्राच्या हिताशी कधीही तडजोड करणार नाही. गरज पडल्यास त्याची वैयक्तिकरीत्या मोठी किंमत मोजण्यास तयार आहेत. अमेरिकेने भारतावर ५०% कराची घोषणा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मोदींचे हे विधान आले. ते कृषिशास्त्रज्ञ एमएस स्वामीनाथन यांच्या जन्मशताब्दीनिमित्त तीन दिवसांच्या जागतिक परिषदेला संबोधित करत होते. सेन्सेक्स नीचांकीवरून ९२६ अंकांची उसळी घेत ७९.२७ अंक वृद्धीसह बंद. आयटी, बँकिंग समभागांची खरेदी. मॉस्को| रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी गुरुवारी क्रेमलिन येथे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांची भेट घेतली. सूत्रांच्या माहितीनुसार बाह्य दबाव असूनही सर्व आघाड्यांवर रशियाशी सहकार्य सुरू ठेवण्याच्या देशाच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार डोभाल यांनी केला. दुसरीकडे पुतिन पुढील आठवड्यात संयुक्त अरब अमिरातीमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतील. बैठकीची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.

What's Your Reaction?






