रुग्णालयातर्फे अनोखी मानवंदना:चार भाऊ, दोन मुलांच्या निर्णयामुळे 60 वर्षांच्या ‎व्यक्तीच्या अवयवदानातून तिघांना मिळाले जीवदान‎

‘मृत्यू''''''''आयुष्याचा शेवट असला‎तरी तो दुसऱ्यासाठी एक नवी सुरुवात‎ठरू शकतो. छत्रपती‎संभाजीनगरमधील राठी कुटुंबाने हेच‎दाखवून दिले आहे. ब्रेन डेड (मेंदू‎मृत) झालेल्या ६० वर्षांच्या वडिलांचे‎अवयवदान करून त्यांची २ मुले‎आणि चार भावांनी समाजापुढे एक‎आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या‎निर्णयामुळे तीन गरजू रुग्णांना‎नवजीवन मिळाले आहे.‎ सोमवारी (४ ऑगस्ट) ६० वर्षांचे‎किशोर राठी शहानूरमियाँ दर्गा‎परिसरात दुचाकीवर जाताना त्यांना‎अचानक चक्कर आली. ते खाली‎पडले. त्यांच्या डोक्याला दुखापत‎झाली. पाच वर्षांपूर्वी इचलकरंजीहून‎शहरात स्थायिक झालेले राठी यांना‎तातडीने कमलनयन बजाज‎रुग्णालयात दाखल केले. मात्र, मेंदूत‎मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने‎डॉक्टरांनी त्यांना ब्रेन डेड घोषित‎केले.अशा कठीण प्रसंगी त्यांचे चार‎भाऊ विजयप्रकाश, विष्णुदास,‎घनश्याम आणि हनुमान राठी, त्यांची‎पत्नी सुनीता राठी आणि दोन मुले‎ऋषीकेश, प्रथमेश राठी यांनी‎अवयवदानाचा धाडसी आणि‎सकारात्मक निर्णय घेतला. डॉ.‎विनोद गोसावी यांनी त्यांना‎अवयवदानाची माहिती दिली.‎कुटुंबाने कोणताही विचार न करता‎याला संमती दिली.‎ या निर्णयामुळे राठी यांच्या दोन‎किडन्या आणि एक यकृत (लिव्हर)‎दान करण्यात आले. त्यापैकी एक‎किडनी बजाज रुग्णालयातील एका‎रुग्णाला, दुसरी एमजीएम‎रुग्णालयातील एका रुग्णाला‎प्रत्यारोपित करण्यात आली. यकृत‎मात्र नागपूरमधील न्यू एरा मदर अँड ‎‎चाइल्ड रुग्णालयात पाठवण्यात‎आले. अशा प्रकारे राठी यांनी‎मृत्यूनंतरही तीन रुग्णांना जीवदान‎दिले.‎या महान कार्याबद्दल रुग्णालयाने ‎‎राठी यांना आदराने मानवंदना दिली. ‎‎सध्या अवयवदान जागृती सप्ताह‎सुरू आहे. राठी यांचे उदाहरण ‎‎अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.‎ कुटुंबीयांचा एक निर्णय, तीन जणांना नवे जीवन‎ अवयवदान ही एक अशी प्रक्रिया आहे, जी मृत्यूलाही अमर करते. राठी‎कुटुंबाच्या एका धाडसी निर्णयामुळे तीन रुग्णांना एक नवे आयुष्य मिळाले.‎राठी यांच्या या अवयवदानाच्या निर्णयाबद्दल बजाज रुग्णालयाच्या संपूर्ण‎टीमने त्यांना मानवंदना दिली. यात सर्जन डॉ. अजय ओसवाल, डॉ.‎शिवाजी तौर, डॉ. गीता फेरवानी, डॉ. अजय रोटे, डॉ. मिलिंद वैष्णव आणि‎सीईओ डॉ. जॉर्ज फर्नांडिस यांचा समावेश होता. अवयवदानासाठी पुढे या,‎असे आवाहनही रुग्णालयाने केले आहे.‎

Aug 9, 2025 - 07:38
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow