2 हजार स्वाध्यायींनी काढली 1 हजार दुचाकींवर फेरी:आज धनश्री तळवलकर यांच्या उपस्थितीत राखी पौर्णिमा कार्यक्रम
सिडको वाळूजमहानगर येथील मैदानावर शनिवारी राखीपौर्णिमेचा कार्यक्रम होणार आहे. स्वाध्यायपरिवाराचे प्रवर्तक पद्मविभूषण पांडुरंगशास्त्रीआठवले यांच्या कन्या धनश्री तळवलकर यांचीउपस्थिती असेल. यानिमित्त शुक्रवारी २ हजारस्वाध्यायींनी १ हजार दुचाकींवर फेरीकाढली.क्रांती चौकापासून दुचाकी वाहन रॅलीचेआयोजन करण्यात आले होते. या रॅलीचा क्रांतीचौक, सेंट्रल नाका, टीव्ही सेंटर, बजरंग चौक,कॅनॉट चौक, रामगिरी हॉटेलमार्गे सोहम मोटर्सरामनगर, जयभवानीनगर, पतियाळा बँकगारखेडा, रिलायन्स मॉल, सूतगिरणी, दर्गा चौक,चेतक घोडा विश्वभारती कॉलनी, त्रिमूर्ती चौक,गजानन महाराज मंदिर पांडुरंगशास्त्री आठवलेमार्ग येथे समारोप करण्यात आला.

What's Your Reaction?






