सख्या भावाचा मित्राच्या मदतीने केला खून:मद्यधुंद अवस्थेत आईशी गैरवर्तन केल्याने डोक्यात घातली वीट; तुमसरमधली घटना

तुमसर शहरातील आंबेडकर नगर (आंबा टोली) येथे 35 वर्षीय तरुणाच्या हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. रोशन प्रकाश वासनिक (वय 35) या युवकाची हत्या त्याच्याच सख्ख्या भावाने मित्राच्या मदतीने केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. सुरुवातीला संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या या प्रकरणाचा उलगडा पोलिसांनी केला असून, हत्येचे कारण कौटुंबिक वाद असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत रोशन वासनिक हा गेल्या काही वर्षांपासून दारूच्या व्यसनाच्या आहारी गेला होता. वडिलांच्या मृत्यूनंतर त्याचे मानसिक संतुलन बिघडले होते. तो नेहमीच आपल्या आईशी उद्धटपणे वागत असल्याने घरात नेहमीच तणावाचे वातावरण असायचे. बुधवारी (दि. 6 ऑगस्ट) दुपारी रोशनने पुन्हा एकदा दारूच्या नशेत आईसोबत गैरवर्तन केले. यामुळे त्याचा लहान भाऊ रोहन वासनिक याला प्रचंड राग आला. रागाच्या भरात त्याने रोशनच्या डोक्यात वीट फेकून मारली. या हल्ल्यानंतर जखमी अवस्थेत रोशन घरी परतला आणि झोपी गेला. काही वेळाने त्याचा मित्र लारा किरण मारबते (वय 28) रोशनकडे आला. त्यानेही रागाच्या भरात रोशनला लाथाबुक्क्यांनी आणि काठीने मारहाण केली. वैद्यकीय अंदाजानुसार, लाराने पोटात मारलेली जोरदार लाथ हीच रोशनच्या मृत्यूचे मुख्य कारण ठरली. या लाथेमुळे त्याच्या लिव्हरला गंभीर दुखापत झाली असावी. काही तासांनी रोशन मृतावस्थेत आढळला. तडीपार आरोपी तुमसरमध्ये कसा? या घटनेची माहिती मिळताच तुमसर पोलिस आणि जिल्हा गुन्हे शाखेचे अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तपास केला आणि रोहन वासनिक व त्याचा मित्र लारा मारबते यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. गुरुवारी (दि. 7) दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यांना 11 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस अधीक्षक मयंक माधव करत आहेत. या प्रकरणात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. आरोपी लारा किरण मारबते हा नागपूर मधून तडीपार असतानाही तो तुमसरमध्ये कसा वावरत होता, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याकडे पोलिस यंत्रणांचे दुर्लक्ष झाल्याची टीका होत आहे. एकाच कुटुंबातील भावानेच भावाचा जीव घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Aug 9, 2025 - 07:38
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow