महाराष्ट्र लुटून खाल्लात, आम्हाला शिकवू नका:तुमचं गबाळ कुठून आलं?, तुमचे आजोबा कुठे नोकरी करत होते?, राजेंद्र राऊतांचा रोहित पवारांना सवाल

बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर नाव न घेता थेट आरोपांची तोफ डागली. अर्ध्या हळकूंडाने पिवळे होऊ नका. दुसऱ्यांवर बोट दाखवण्याआधी तुमचं काय चाललं आहे, ते पाहा. अख्खा महाराष्ट्र लुटून खाल्ला आहे तुम्ही! अशा शब्दांत राऊत यांनी रोहित पवारांवर रोष व्यक्त केला. गेल्या काही दिवसांपासून रोहित पवार आणि राऊत यांच्यातील वाद उफाळून आला आहे. शरद पवार गटाच्या एका पदाधिकाऱ्याची गाडी पेटवण्यात आली होती. या घटनेमागे आमचा हात असल्याचा अप्रत्यक्ष आरोप रोहित पवारांनी केला होता. यावर प्रत्युत्तर देताना राऊत यांनी ‘खोट्या आरोपांना आम्ही गप्प बसणारे नाही’ असा इशारा दिला. तुम्हाला ईडीच्या नोटीस का आल्या? राजेंद्र राऊत म्हणाले की, आमची जहागिरी पाहण्यापेक्षा तुमचे आजोबा कुठे नोकरी करत होते, ते सांगा. एवढा पैसा आणि एवढे गबाळ कुठून आले? ईडीच्या नोटीस का आल्या? एवढ्या कारखान्याच्या भानगडी आधी स्पष्ट करा! असा सवाल त्यांनी उपस्थित केला. गाडी जाळण्याशी संबंध नाही राजेंद्र राऊत म्हणाले की, तुमच्या आजोबांनी देशाचे राजकारण केले, पण नेमके कसे केले हे माहिती करून घ्या. चुकीच्या माहितीवर आरोप केल्यास प्रत्युत्तर दिले जाईलच, असा टोला राऊत यांनी लगावला. गाडी जाळल्या च्या प्रकरणात आपला मुलगा रणवीर याचा काहीही संबंध नाही, असे स्पष्ट करताना राऊत म्हणाले, त्या पूर्वी जी शिवीगाळ झाली, ती त्या मुलाने एका महिलेस छेडल्या मुळे झाली होती. आम्ही काहीही लपवून करणारे नाही. बार्शीतील 35 टक्के जमीन आमची राजेंद्र राऊत म्हणाले की, बार्शीतील 35 टक्के जमीन आमच्या राऊत कुटुंबाची आहे. शिवरायांच्या काळात आमचे पूर्वज घोडेस्वार होते. त्यावेळी ही जमीन जहागिरी तून मिळाली होती. आमच्या इतिहासावर प्रश्न उभा करण्यापूर्वी स्वतःचा इतिहास पाहा, असा सल्लाही त्यांनी रोहित पवारांना दिला. ..तर आम्ही गप्प बसणार नाही राजेंद्र राऊत म्हणाले की, खोट्या आरोपांना आता तोंड दिले जाईल. आम्ही गप्प राहणारे नाही. राजकारणात आलेत म्हणून सगळे सहन करावे, हे शक्य नाही, असा इशारा देत राजेंद्र राऊत यांनी रोहित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला.

Aug 2, 2025 - 21:25
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow