भूमि अभिलेख कर्मचाऱ्यांचेबेमुदत कामबंद आंदोलन:जिल्हा कचेरीसमाेर िठय्या, परिरक्षण भूमापक व सर्वेअरची पदे भरा
भूमि अभिलेख विभाग हा शासनाचा पुरातन विभाग असून सर्व विकास कामाचा पाया आहे, परंतु या विभागाकडे शासनाचे कायम दुर्लक्ष झाले आहे. खात्यातील संपूर्ण कामे तांत्रिक झाली आहेत. कर्मचाऱ्यांची पात्रता तांत्रिक करण्यात आलेली आहे. सन २०१२ पासून बी.ई. सिव्हील, पॉलटेक्नीक, सर्व्हेअर , आयटीआय सर्व्हेअर धारक तांत्रिक कर्मचाऱ्यांची नेमणूक खात्यामध्ये करण्यात आलेली आहे, मात्र वेतनश्रेणी ही इतर विभागातील सर्व्हेअर पदाचे वेतन श्रेणीपेक्षा कमी दर्जाचे असून लिपिकीय वर्गाची वेतनश्रेणी खात्यात कर्मचारी यांना लागू आहे. आंदोलनकर्ता कर्मचाऱ्यांची भूमि अभिलेख विभागास तांत्रिक वेतनश्रेणी लागू करावी या प्रमुख मागणीसह खालील मागणीकरीता बेमुदत काम बंद आंदोलन सुरु आहे. परिरक्षण भूमापक व सर्वेअरची पदे भरा, यासह शासन दरबारी विविध प्रकारच्या मागण्या प्रलंबित असल्याने भूमि अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. प्रतिनिधी | अकोला परिरक्षण भूमापक व सर्वेअरची पदे भरा, यासह मागण्या प्रलंबित असल्याने भूमि अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले. आंदोलनाअंतर्गत कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या दिला. केंद्रीय कार्यकारिणी विदर्भ भूमी अभिलेख कर्मचारी संघटना अमरावती, नागपूर यांनी केलेल्या आवाहनावर २६ मे पासून भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले. जनतेच्या कामाची अडवणूक होणार नाही, यासाठी शासनाने आंदोलनाची दखल घ्यावी, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. आंदोलनात नितीन पारधी, राजेश घोगले, एस. आर. ताथोड, डी. एस. भारसाकळे , एस. गावत्रे , ये. एल. भगत, यु. बी, पाथरकर, नीरज सिरसाट, पूनम देवाते , प्रशांत दामधर, एच के राठोड, एस.एस. गाडगे , विजय बावणे, महेश राजनकर , राजेश वाघोडे, संदीप नागे आदी सहभागी झाले होते. मागण्यांसाठी आग्रह विदर्भ मूमी अभिलेख कर्मचारी संघटनेने प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन सुरु केले. परिरक्षण भूमापक व सर्वेअरची पदे भरावी. व्हर्जन २.०० व ईपीसीआयएसची साईट सुरळीत करावी. सर्व सर्व्हेअर यांना रोअर व लॅपटॉप उलब्ध करुन द्यावे. वर्ग-२ व वर्ग-३ चे पदोन्नती करण्यात यावी. नवीन नगर भूमापन कार्यालये स्थापन करावी. शासन निर्णयाप्रमाणे भूमि अभिलेख विभागाचे पदनामामध्ये बदल करावे.

What's Your Reaction?






