सर्वात मोठे ड्रोन हल्ले:युक्रेनचा रशियामध्ये 4 हजार किमी घुसून हल्ला... ट्रकमधून ड्रोन डागले, युक्रेनकडून रशियाची 40 विमाने नष्ट

रशियन मीडिया व युद्ध समर्थकांनी हा दिवस रशियासाठी ‘विमान वाहतुकीतील सर्वात काळा दिवस’ म्हटले असून पुतीन यांनी अणुहल्ला करण्याची मागणी केली. ड्रोन कंटेनरद्वारे रशियामध्ये नेले. एक ट्रक मुर्मन्स्कमधील ओलेनेगोर्स्क येथील पेट्रोल पंपावर थांबला, जेथे ड्रोन बाहेर काढले व एअरबेसकडे निघाले. ड्रोन एफपीव्ही तंत्रज्ञानाने सुसज्ज व उपग्रहाद्वारे नियंत्रित केले जात होते. रशियाच्या बेलाया एअरबेससह अनेक एअरफील्डवर ४० रशियन लष्करी विमानांना लक्ष्य केले. रशियाच्या इर्कुत्स्क प्रदेशात हा हल्ला झाला. युक्रेनने ज्या विमानांवर हल्ला केला ती अण्वस्त्रे वाहून नेण्यास सक्षम होती. रशियन अणु धोरणानुसार त्यांच्या अणु क्षमतेवर हल्ल्याचा परिणाम झाला तर ते अणुप्रत्युत्तर देऊ शकतो. या आधारे रशियन युद्ध समर्थकांनी पुतीनकडे अणुहल्ल्याची मागणी केली आहे. शांतता चर्चेपूर्वी हल्ला... पाणबुडी तळही लक्ष्य इस्तंबूलमध्ये रशिया आणि युक्रेनमध्ये शांतता चर्चा होणार असताना हा हल्ला झाला. याआधी रशियावर दबाव आणण्याची रणनीती म्हणून या हल्ल्याकडे बघितले जात आहे. काही अपुष्ट वृत्तांनुसार, आर्क्टिकमधील रशियाच्या सेव्हेरोमोर्स्क या अणु पाणबुडी तळावरही हल्ला करण्यात आला आहे. हा तळ रशियाच्या नॉर्दर्न फ्लीटचे मुख्यालय आहे. कोला द्वीपकल्पातील स्फोटांनंतर काळ्या धुराचा व्हिडिओ समोर आला आहे. तथापि, तिथे काय लक्ष्य केले गेले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्कींची पूर्ण मोहिमेवर होती देखरेख युक्रेनच्या लष्करी अधिकाऱ्याने सांगितले की, सुमारे दीड वर्षाच्या तयारीनंतर ही कारवाई केली. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्या देखरेखीखाली हे नियोजन केले होते. या हल्ल्यात वापरलेले ड्रोन युक्रेनमध्ये विकसित व तयार केले होते, जे रशियन सीमा ओलांडून अचूकतेने लक्ष्यांवर मारा करण्यात यशस्वी झाले. हा हल्ला रशियन हवाई संरक्षण कमकुवत करण्यासाठी होता. यातून रशियन हवाई दलाचे आतापर्यंतचे सर्वात मोठे नुकसान झाल्याचा दावाही केला जात आहे. या हल्ल्यात मिग आणि सुखोईसारखी आधुनिक लढाऊ विमाने आणि काही वाहतूक विमाने नष्ट झाली. युक्रेनच्या हल्ल्यात उद्ध्वस्त विमान दिव्य मराठी नेटवर्क . कीव्ह (युक्रेन)|तीन वर्षांपासून सुरू रशिया-युक्रेन युद्धात युक्रेनने रविवारी रशियावर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला केला. यात ४० हून अधिक रशियन लष्करी विमाने नष्ट झाली. हल्ल्यामुळे झालेल्या नुकसानीची अंदाजे किंमत १.५ अब्ज पौंड (सुमारे १.७२ लाख कोटी रु.) आहे. दरम्यान, रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला केला. ४७२ ड्रोन आणि ७ क्षेपणास्त्रे डागली. यात १२ युक्रेनी सैनिक ठार झाले.

Jun 5, 2025 - 04:47
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow