‘एक दिवस मेळघाट’साठी : शाळा, अंगणवाडी दुरुस्तीस प्राधान्य:निधीची तरतूद, संबंधितांकडून सविस्तर अहवाल मागवला‎

मेळघाटमधील वास्तव जाणून घेतल्यानंतर जिल्हा परिषदेच्या सीईओ संजीता महापात्र यांनी शाळा व अंगणवाडीच्या दुरुस्तीला प्राधान्य देण्याचे ठरवले आहे. याशिवाय काही गावांना जोडणारे रस्ते, त्या गावांमध्ये नियमित न होणारा वीज पुरवठा आणि पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी त्या व्यक्तीश: चर्चा करून तोडगा काढणार आहेत. ‘एक दिवस मेळघाटसाठी’ हे अभियान राबवल्यानंतर सीईओंनी मंगळवारी धारणी आणि चिखलदरा पंचायत समितीच्या बीडीओंची ऑनलाइन बैठक घेतली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून त्याला मेळघाटच्या सुधारणांचा ‘ॲक्शन प्लॅन’ असे नाव देण्यात आले आहे. सीइओ, अतिरिक्त सीइओ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह संपूर्ण यंत्रणेला गेल्या शुक्रवारी मेळघाट मुक्कामी नेले होते. रात्रभराच्या मुक्कामानंतर दुसऱ्या दिवशी सर्व ३६ अधिकाऱ्यांची चिखलदरा येथे त्यांनी बैठक घेतली. त्यातून प्रत्येक गावची काय अडचण आहे, हे लक्षात आले होते. त्याला अनुसरूनच मंगळवारच्या बैठकीत कृती कार्यक्रम निश्चित केला. मुक्कामानंतरच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या आढावा बैठकीत मेळघाटच्या दोन्ही तालुक्यातील शिक्षण, आरोग्य, घरकुल, पशुसंवर्धन, वनहक्क, वनउपजचा विनियोग यासह सरकारी लाभाच्या योजनांची स्थिती असे प्रमुख मुद्दे पुढे आले होते. शिवाय रस्ते, पुल, रपटे आणि शासकीय कार्यालयांच्या इमारतींची दुरुस्तीही चर्चेत होती. या सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करून निर्णय घेणे शक्य नव्हते. त्यामुळे दोन्ही तालुक्यांच्या बीडीओंनी एक सर्वंकष अहवाल तयार करावा आणि त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल, असे ठरवण्यात आले होते. ही बैठक त्यासाठीच होती. एक दिवस मेळघाटसाठी अंतर्गत स्वत: सीईओ मेळघाटच्या चिखलदरा तालुक्यातील हतरु आरोग्य केंद्रांतर्गतच्या कुटीदा या अतिदुर्गम गावात मुक्कामी थांबल्या होत्या. या दरम्यान त्यांनी गावकऱ्यांची बैठक घेतली. बैठकीत गावच्या अडचणींसह तेथील रहिवाशांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणखी काय करता येईल, याचाही रोडमॅप तयार करण्यात आला होता. जि. प. प्रशासनाच्या वेळा पत्रकानुसार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रिती देशमुख ह्या काटकुंभ आरोग्य केंद्रांतर्गतच्या बिच्चूखेडा येथे, तर डेप्युटी सीईओ बाळासाहेब बायस हे सेमाडोह आरोग्य केंद्रांतर्गतच्या रेहट्याखेडा येथे आणि अभियंता दिनेश गायकवाड हे हतरु आरोग्य केंद्रांतर्गतच्या कुही गावात थांबले होते. बैठकीत ठरल्यानुसार नेमक्या कोणत्या शाळा आणि अंगणवाडीच्या इमारतींना दुरुस्तीची गरज आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या कोणत्या गावांमध्ये तीव्र झाली आहे. रस्ते कोणत्या गावांसाठी नाहीत आणि वीज पुरवठा अनियमित होत असलेली गावे कोणती आहेत, याचा सविस्तर अहवाल पाठवण्याचे निर्देश सीईओंनी दिले आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला प्रारंभ केला जाणार आहे. दरम्यान त्यासाठीच्या निधीची तरतूद करण्यासाठीही सीईओंनी स्वतंत्र तयारी सुरू केली आहे. निधीची तरतूद, संबंधितांकडून सविस्तर अहवाल मागवला

Jun 5, 2025 - 04:49
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow