बकरी ईदला स्वच्छतेसाठी प्रार्थनस्थळात कंपोस्टेबल बॅग:वस्तीत कंटेनर ठेवणार, महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांनी घेतली आढावा बैठक‎

बकरी ईदला मशीदीसह मुस्लीम वस्तीच्या परिसरात स्वच्छता राहावी, पाण्याची उणीव जाणवू नये तसेच कुर्बानी दिल्यानंतर टाकाऊ पदार्थ फेकण्यासाठी प्रत्येक मशीदीत जाऊन कंपोस्टेबल बॅगचे वाटप करण्याचे तसेच मुस्लीम प्रभागांमध्ये नवीन कंटेनर ठेवण्याचे आदेश मनपा आयुक्त सचिन कलंत्रे यांनी दिले. तसेच पशुवैद्यकीय विभागामार्फत विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली. मंगळवारी ३ जून रोजी झालेल्या बैठकीमध्ये मुस्लीम बांधवांकडून मिळालेल्या सूचनांनुसार उपाययोजना करण्यात येतील, अशी ग्वाही मनपा आयुक्तांनी दिली. महानगरपालिका, पशुवैद्यकीय विभागाद्वारे मुस्लीम बांधवांचा शनिवारी ७ जूनल होणारा बकरी ईद हा सण स्वच्छतापूर्ण व पर्यावरण पूरक व्हावा, यासाठी मनपा आयुक्त सचिन कलंत्रे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला मनपा उपायुक्त डॉ. मेघना वासनकर, कार्यकारी अभियंता रवींद्र पवार, पशु शल्य चिकित्सक डॉ. सचिन बोंद्रे , पोलिस उपायुक्त शिंदे, सहायक पोलिस आयुक्त तसेच बडनेरा पो.स्टे. पोलिस निरीक्षक सुनील चव्हाण, गाडगेनगर ठाण्याचे पोलिस निरीक्षक, खोलापुरी गेट पो.स्टे. पोलिस निरीक्षक गौतम पठारे, नागपुरी गेट पो.स्टे. पोलिस निरीक्षक हनुमंत उरला गोंडावार, फ्रेजरपुरा पो.स्टे. पोलिस निरीक्षक, स्वास्थ्य अधीक्षक श्रीकांत डवरे, ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक, स्वास्थ्य निरीक्षक व सर्व पोलिस स्टेशनचे अधिकारी उपस्थित होते. बकरी ईद सणानिमित्त जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्तांच्या झालेल्या बैठकीला अनुसरून मनपा क्षेत्रातील सर्व मुस्लीम बांधवांनी उत्साह व शांतता पूर्ण वातावरणात आरोग्यदायी व पर्यावरणपूरक ईद साजरी करण्साठी मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन मनपा आयुक्तांनी केले. महानगरपालिका हद्दीतील पशुपालकांनी गाय ,वळू, बैल, वासरे या मोकाट सोडलेल्या जनावरांना ओळख चिन्ह देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या चिकीत्सालयात जनावरांना घेऊन जावे. बकरी ईद संदर्भाने सर्व मुस्लीम बांधवांनी महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा व गोवंश हत्या प्रतिबंध कायदा अधिनियमानुसार कुर्बानी करीता जनावरांचा वापर करावा व प्रशासनास सहकार्य करावे, अशाही सुचना देण्यात आल्या.

Jun 5, 2025 - 04:49
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow