शिक्षकांचे प्रशिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह:सात तास प्रशिक्षणात चहा-पाणी नाही, शिक्षकांची शिक्षणाधिकारी ते शिक्षण संचालकांपर्यंत तक्रार

सलग सात तास प्रशिक्षण, मध्ये केवळ अर्ध्या तासाचा खंड. परंतु या सात तासांत ना चहा ना पाणी. नाश्ता, जेवण तर दूरच, अशी प्राथमिक शिक्षकांची स्थिती झाली आहे. दरम्यान शिक्षकांप्रती एवढी असंवेदनशीलता का, असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला असून प्रशिक्षणार्थ्यांनी ही बाब शिक्षणाधिकारी ते शिक्षण संचालक यांच्यापर्यंत पोहोचवली आहे. पुणे येथील महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने शिक्षकांचे वरीष्ठ व निवड श्रेणीचे प्रशिक्षण सुरु केले आहे. २ ते १२ जून असा या प्रशिक्षणाचा कालावधी आहे. अमरावतीत हे प्रशिक्षण होलीक्रॉस कॉन्व्हेंटमध्ये सुरु आहे. याशिवाय मोर्शी येथील श्री. आर.आर. लाहोटी विज्ञान महाविद्यालय आणि परतवाडा येथील फातेमा हायस्कुल येथेही असेच प्रशिक्षण सुरु असून सर्व ठिकाणची स्थिती एकसारखीच आहे. सदर प्रशिक्षणासाठी प्रत्येक सहभागी शिक्षकाकडून २ हजार रुपये शुल्क घेण्यात आले आहे. प्रशिक्षणाची रोजची वेळ सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.३० अशी आहे. तासांमध्ये मोजल्यास एकूण सात तास होतात. यामध्ये केवळ अर्ध्या तासाचा ब्रेक दिला जातो. परंतु तेवढ्या तोकड्या वेळेत घरी किंवा बाहेर जाऊन जेवन घेणे शक्य होत नाही. त्यामुळे प्रशिक्षणस्थळीच या बाबी पुरवणे अभिप्रेत आहे. परंतु आयोजकांकडून अशी कोणतीही व्यवस्था याठिकाणी करण्यात आली नाही. एवढेच काय तर साधे पिण्याचे पाणी पुरविण्याचे सौजन्यसुद्धा आयोजकांनी दाखविले नाही. त्यामुळे सहभागी सर्व शिक्षक व्यथित झाले आहे. प्रशिक्षण सकाळी साडे ९ वाजता सुरू होत असल्याने सर्व शिक्षक शिक्षिका यांना ९.१५ वाजता हजर होण्याचे आदेश आहेत. बरेच शिक्षक-शिक्षिका बाहेरगावाहून प्रशिक्षण घेण्यास आल्या आहेत, तर बऱ्याच लोकांचे घर हे प्रशिक्षण स्थळापासून बरेच दूर आहेत. शिवाय काही प्रशिक्षणार्थी ऑटोरिक्षा व इतर साधनांनी प्रशिक्षण स्थळापर्यंत पोहोचतात. सकाळच्या घाईमुळे बऱ्याच प्रशिक्षणार्थींना स्वतः चा टिफीन आणणे शक्य नाही, आणि मधला ब्रेक केवळ अर्ध्या तासांचा असल्याने बाहेर जाऊन येणे पण शक्य नाही. त्यामुळे प्रशिक्षणाच्या वेळचे नियोजन करताना सदर संस्थेला ही बाब लक्षात आली नसेल का? असा सवालही उपस्थित केला जात आहे.

Jun 5, 2025 - 04:49
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow