नाशिकमध्ये मंगळसूत्र चोरी करणाऱ्या चोराला चोप:घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद, महिलेच्या धाडसाचे कौतुक
नाशिक: जया भवानी रोड परिसरात एका महिलेने प्रसंगावधान राखत तिचं मंगळसूत्र चोरून पळणाऱ्या चोराला पकडून त्याची जोरदार धुलाई केली आहे. या घटनेचा व्हिडिओ परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. महिला सकाळच्या सुमारास पूजा करण्यासाठी घराबाहेर निघाली होती. याचवेळी तिच्या घराबाहेर एक मोटारसायकलवरून आलेल्या चोराने तिच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढून पळ काढण्याचा प्रयत्न केला. चोर मंगळसूत्र हिसकावून मोटारसायकलवर बसत असतानाच महिलेने धाडसाने त्याचा पाठलाग केला आणि काही अंतरावर जाऊन त्याला पकडले. महिलेच्या या धाडसी कृतीमुळे चोर तिच्या तावडीत सापडला आणि त्याला चांगलाच चोप देण्यात आला. नंतर स्थानिकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली आणि चोराला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, नाशिककर सोशल मीडियावर या महिलेचे कौतुक करत आहेत.

What's Your Reaction?






