पुण्यात मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडल्याने कामगाराचा मृत्यू तर 2 जण जखमी:मनपा प्रकल्पासाठी खोदकाम करताना झाला अपघात

पुण्यात मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडल्याने एक कामगाराचा मृत्यु झाला असून इतर दोन कामगार जखमी आहेत. पुण्यातील नांदेड सिटी परिसरात महानगरपालिका प्रकल्पासाठी उत्खनन करताना हा अपघात झाला आहे. या बाबत मिळालेल्या माहितीनुसार पुण्याच्या नांदेड सिटी परिसरात उत्खनन करताना माती कोसळल्याने तीन कामगार मातीखाली गाडले गेले आहेत. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे तर दोन कामगारांना सुखरूप वाचवण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या जिका प्रकल्पांतर्गत नदी सुधारणा प्रकल्पासाठी खोदकाम सुरू असताना नांदेड सिटी जवळ रस्त्याच्या कडेला हा अपघात घडला. यादरम्यान, मातीचा ढीग कामगारांच्या अंगावर पडला आणि कामगार त्यात अडकले गेले. तात्काळ अग्निशमन दल, पोलिस आणि पीएमआरडीएच्या पथकाने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांना बाहेर काढले. आम्ही हे वृत्त अपडेट करत आहोत...

Aug 5, 2025 - 16:53
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow