प्रसाद प्रकाशनाचा पुरस्कार वितरण सोहळा:डॉ. अरुणा ढेरे यांच्यासह अनिल मेहता यांना सन्मान, 18 पुस्तकांचे प्रकाशन

भारतीयांना काळानुरूप परिवर्तनशीलतेचा वारसा लाभला आहे. संस्कृतीचे विस्तीर्ण आभाळ आपल्याला लाभले असून विश्वकल्याणाची संकल्पना खूप आधीच आपल्यात रुजलेली आहे, असे मत ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरूणा ढेरे यांनी व्यक्त केले. 'प्रसाद प्रकाशना'तर्फे आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार वितरण आणि ग्रंथ प्रकाशन सोहळ्या प्रसंगी पुरस्काराला उत्तर देताना डॉ. अरुणा ढेरे बोलत होत्या. यावेळी डॉ. अरुणा ढेरे आणि ज्येष्ठ प्रकाशक अनिल मेहता यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. एस. एम. जोशी सभागृहात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर गीता धर्म मंडळाचे अध्यक्ष डॉ. मुकुंद दातार, ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ प्रा. प्र. के. घाणेकर, राष्ट्रीय पुस्तक न्यासचे विश्वस्त राजेश पांडे, प्रसाद प्रकाशन आणि प्रसाद ज्ञानपीठच्या संचालक डॉ. उमा बोडस आदी मान्यवर उपस्थित होते. यानिमित्त प्रसाद प्रकाशन आणि अनाहत प्रकाशनातर्फे विविध १८ पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी बोलताना डॉ. अरूणा ढेरे म्हणाल्या की, आपण आजही पाश्चात्यांची संस्कृती पाहण्यासाठी परदेशात जातो. तिथे आपल्याला भग्न अवस्थेतील अनेक अवशेष दिसतात. भारतात मात्र भग्न अवस्थेतील अवशेषांसह सांस्कृतिक धागा आजही जीवंत असल्याचे आपल्याला पहायला मिळते. आपली संस्कृती नानाविविध रूपाने आपल्या पुढे येत असते, आपण ती जपणे आणि पुढच्या पिढीकडे हस्तांतरीत करणे, हे आपले कर्तव्य आहे. राजेश पांडे म्हणाले की, समाजचे आपण देणे लागतो या भावनेतून आणि कार्यकर्त्याच्या भूमिकेतून मी काम करत आहे. पुण्याला ज्ञानाचे आणि आध्यात्माचे अधिष्ठान लाभलेले आहे. पुस्तक महोत्सवाच्या माध्यमातून बुद्धिजीवी पुणेकरांची प्रचिती येते. पुस्तक वाचनाची पुणेकरांची भूक पाहून अचंबित व्हायला होते. पुस्तक महोत्सवाला पुणेकरांनी दिलेला प्रतिसाद प्रचंड होता. सुमारे १० लाख पुणेकरांनी या महोत्सवाला भेट दिली आणि त्यामध्ये सुमारे चार लाख युवक होते. २५ लाखांहून अधिक पुस्तक विक्री यामध्ये झाली. मुद्राकांनी तर २४ तास मुद्रणालये सुरू ठेवून आऊट ऑफ प्रिंट पुस्तके पुनर्मुद्रीत केली. नॅशनल बुक ट्रस्टचे कार्यालय पुण्यात लवकरच सुरू होत असून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजेल असे केंद्र उभे राहणार आहे. येत्या काळात पुण्याला पुस्तकांची राजधानी बनविण्याचा निर्धार आम्ही केला असून पुणेकरांच्या सोबतीने आणि सहकार्याने हे उद्दिष्ट साध्य होईल, असा मला विश्वास वाटतो.

Jun 2, 2025 - 03:43
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow