विद्यार्थ्यांना त्यांच्या कलेनुसार करिअर करण्यासाठी पालकांनी मोकळीक द्या:प्रज्ञाशोध परीक्षेतील 197 गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव‎

शालेय अभ्यासक्रमा बरोबरच ज्या कलेत विद्यार्थ्यांना रस व आवड आहे त्यात करिअर करण्यासाठी पालकांनी मोकळीक द्यावी. ज्यामुळे मुले करिअरमध्ये उत्तुंग यश मिळवतात, असे करकंब पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सागर कुंजीर यांनी सांगितले. महर्षी वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या वतीने घेण्यात आलेल्या प्रज्ञाशोध (एटीएस) परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ करकंबमध्ये सोमवारी संपन्न झाला. या वेळी सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षक रघुनाथ जाधव, रोटरी क्लबचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रशांतकुमार मोरे, प्रा. किसन सलगर, केंद्र प्रमुख आदमरजा शेख, आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल पिराची कुरोलीच्या मुख्याध्यापिका निशा गोमे, मुख्याध्यापक शहाजी पाटील इत्यादी उपस्थित होते. या वेळी यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्रे देऊन गौरवण्यात आले. सुरुवातीस दीपप्रज्वलन करून व सावित्रीबाईंच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पांढरे वाडी केंद्रातील विद्यार्थीनींनी स्वागत गीत सादर केले.या परिक्षेसाठी पंढरपूर तालुका समन्वयक म्हणून मनीषा नितीन शेटे यांनी काम केले. प्रज्ञाशोध परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवर व पालक वर्ग. राज्य पातळी, जिल्हास्तरीय आणि गटस्तरीय स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला शाळांचा उदंड प्रतिसाद लाभला. त्यामुळे स्पर्धा यशस्वी ठरली. जिल्ह्यासह राज्यभरातून स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी आले होते. परीक्षा दिल्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांचा गौरव करताना त्यांच्या चेहऱ्यावर विजयाचा आनंद दिसून येत होता. १९० शाळांतील ११८५ विद्यार्थ्यांनी प्रज्ञाशोध परीक्षेत घेतला होता सहभाग इयत्ता पहिली ते सातवीमधील जवळपास १९० शाळांतील ११८५ विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभाग घेतला होता. त्यापैकी १९७ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले. त्यात राज्यस्तरीय १०, जिल्हास्तरीय २७ तर अनेक विद्यार्थ्यांनी केंद्रात क्रमांक पटकावले.

Aug 6, 2025 - 14:36
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow