चांदूर बाजार येथील डॉक्टर असोसिएशनची पार पडली निवडणूक:अध्यक्षपदी डॉ.छाया ढोले, उपाध्यक्षपदी डॉ. तनवीर अन्सारी यांची केली निवड
प्रतिनिधी | चांदूर बाजार डॉक्टर असोसिएशन अध्यक्ष डॉ.छाया ढोले तर उपाध्यक्ष म्हणून डॉ. तनवीर अन्सारी यांचे मतदान पद्धतीने निवड केली. या निवडणुकीमध्ये अध्यक्ष पदासाठी डॉ. छाया ढोले व डॉ.अभिजीत चव्हाण यांनी आपला नामांकन दाखल केला होता. यामध्ये डॉ.छाया ढोले विजयी झाल्या. तर उपाध्यक्ष पदासाठी तीन नामांकन दाखल झाले होते. यामध्ये डॉ. तनवीर अन्सारी ,डॉ. अभिजीत चव्हाण, डॉ. अकबर यांचा समावेश होता. तर उपाध्यक्ष म्हणून डॉ.तन्वीर अन्सारी यांचा विजय झाला. यामध्ये सचिव म्हणून डॉ. नीलेश तिरमारे हे विजयी झाले. कोषाध्यक्ष पदाकरिता सुद्धा त्यांनी आपले नामांकन दाखल केले होते. डॉ.अभिजीत चव्हाण, डॉ. अकबर व डॉ. विकास नेहटकर यांचा समावेश होता. तर कोषाध्यक्ष डॉ.विकास नेहटकर यांचा विजय झाला. या निवडणुकीमध्ये डॉ. हेमंत रावळे, डॉ.मुकुंद मोहोड, डॉ.विजय डोशी, डॉ.अनंत ढोले,डॉ.झकिरउद्दीन सेफी, डॉ. जयराज कीटुकले, डॉ. हेमंत फुके, डॉ. पराग कीटूकले, डॉ.सचिन काळे, डॉ. सागर देवांग, डॉ.परवेज खान, डॉ. सचिन गणोरकर, डॉ.वसीमराजा, डॉ.अमोल हरणे, डॉ. राहुल हरकुट, डॉ.जयराज किटकले, डॉ. अक्षय ढोले, डॉ. सौरभ नागापुरे, डॉ. चिरंजीत बिसवास, डॉ. संकेत आढाऊ, डॉ. शुभम चौरे ,डॉ. ललित चव्हाण, डॉ.उमेश नाईक ,डॉ. प्रेरीत तातेड, डॉ.राजेश मुनोत, डॉ. आनंद किटुकले ,डॉ. विशाल भोम्बे, डॉ. उझमा अन्सारी, डॉ. प्रियंका किटुकले, डॉ.मनोज चिठोरे, डॉ. तेजस्विनी फुके, डॉ.सुरेखा तायवाडे, डॉ. ज्योती मोहोड, डॉ. संजय देशमुख डॉ.मोहम्मद रिजवान ,डॉ. नावेद, डॉ.मूनवर, डॉ.अजमल नदीम, डॉ.समीर आदी उपस्थित होते.

What's Your Reaction?






