श्रावणमास:महिलांनो, सासू-सासरे, दीर, ननंदेशी सौजन्याने वागा, मोहोळ येथील विठ्ठल मंदिरात सोहाळ्याच्या जगताप महाराजांनी हरिकीर्तनातून केले प्रबोधन
मुंगी इतर मुंग्यांप्रमाणे माणसांना चावत होती. एका मुंगीने ठरवले न चावता या माणसाच्या पॉकेटमध्ये बसून मुंबई गाठायची. तिने मुंबई गाठली. आपण वाईटची संगत सोडली अन् संतांच्या संगतीत राहिले तर सुखप्राप्ती मिळेल. पुंडलिकाला आई-वडिलांची सेवा करता करता देव प्राप्त झाला. त्यांनी देवांना सांगितले माझी सेवा होईपर्यंत तू विटेवरीच उभा राहा. म्हणून महिलांनो, आई-वडिलांबरोबरच सासू-सासरे, दीर-ननंद यांच्याशी सौजन्य वागा, सेवा करा. तुम्हाला भगवंत प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रबोधन सोहाळ्याच्या जगताप महाराजांनी केले. ते विठ्ठल मंदिर मोहोळ येथे महिन्याच्या एकादशीनिमित्त नियमितप्रमाणे जगताप महाराज यांचे मंगळवारी हरिकीर्तन घेण्यात आले होते. यावेळी प्रबोधन करताना त्यांनी व्यक्त केले. या वेळी बजरंग गायकवाड, सिद्राम भांगे, अशोक गायकवाड, रामचंद्र लाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी माळकरी, टाळकर,विणेकर सह भक्तजन उपस्थित होते. सुनेला मुलीप्रमाणे जपा, अन् अध्यात्माकडे वळा जगताप महाराज म्हणाले, आपल्या मुलीप्रमाणे सुनेला जपा. आपली लक्ष्मी आहे. कुटुंबातील लहानथोरांना रामायण,गीता वाचायला सांगा. तंत्रज्ञान खूप विकसित झाले आहे. मात्र सुख देऊ शकत नाही. जगाला सुख पाहिजे असेल तर अध्यात्माकडे वळा सुख प्राप्ती होईल. सध्या जग पैसा मिळवण्याच्या मार्गाने धावत आहे. मात्र सुख हिरावत आहे. जीवनामध्ये पैशापेक्षाही सुखाला जास्त महत्व आहे. असा उपदेश सासरच्या मंडळींसाठी महाराजांनी यावेळी केला. यावेळी शेकडो श्रोते मंडळी उपस्थित होते.

What's Your Reaction?






