धुक्यात जीव धोक्यात घालून पर्यटक करतात जीवाचे रान:दोन महिन्यांत घाटघरला 3 हजार 545 व रतनवाडीस झाला 3 हजार 692 मिलिमीटर पाऊस‎

तालुक्यातील सह्याद्री डोंगररांगेतील आदिवासी अतिदुर्गम घाटघर परिसर महिनाभरापासून धुक्यात हरवला आहे. मेपासून दररोज कोसळणाऱ्या पावसामुळे घाटघर व परिसर जलमय झाला आहे. आता त्याला जोड दाट धुक्याची मिळाली आहे. यामुळे येथील गावकऱ्यांचा दैनंदिन संघर्ष तीव्र बनला आहे. संपूर्ण परिसर धुक्यात हरवतो आहे. अधूनमधून सरीवर सरी येतात. पाच फुटांवरच्या पुढे काहीच दिसत नाही. या रम्य निसर्गाचा अलौकिक आनंद घ्यायला पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. आदिवासींना परिसरातून पडणारे हे धुके नकोसे झालेय, पण त्याचीच अनुभूती घेण्यास पर्यटक अधिक पसंती देताना दिसतात. धुक्यात हरखून जाण्यास पर्यटकांची संख्या वाढतच आहे. अपघाताचा धोका माहिती असूनही निसरड्या रस्त्यावरील वळणे कवेत घेत चारचाकीतून ते घाटनदेवीपर्यंत फॉगलॅम्प व तीव्र हेडलाईन लावून येतात. दोन महिन्यांत (१ जूनपासून) घाटघर येथे ३ हजार ५४५ व रतनवाडीस ३ हजार ६९२ मिमी पाऊस झाला. तर २५ जुलैपासून एका आठवड्यात घाटघर येथे ५५६ व रतनवाडीस ६८१ मिमी पाऊस झाला. भंडारदरा धरण पाणलोटातील गावांना अतिवृष्टीसोबतच दाट धुक्यात लपेटून गेले आहे. दीड महिन्यानंतर शुक्रवारी (१ ऑगस्ट) दुपारी घाटघरवासियांना अल्पकाळाचे सूर्यदर्शन घडले. यावर्षी मे महिन्यात आवकाळी व नंतर १ जूनपासून मौसमी पाऊस सक्रिय राहील्याने भात राब टाकण्यास उशीर झाला. २५ मे ऐवजी जूनच्या पहिल्या आठवड्यात राब टाकण्यात आले. परिणामी भात रोपे पाहीजे तशी सशक्त होऊ शकली नाहीत. आहे तीच रोपे लागवडीस वापरून आवण्या पूर्ण करण्यात आल्या. याचा दुष्परिणाम यावर्षी भात उताऱ्यावर होईल व पर्यायाने तांदूळ उत्पादन घटेल. जुलैच्या अखेरीस पुन्हा पाऊस सक्रिय झाला. सद्यस्थितीत पाऊस सक्रिय असला तरीपण त्याचे सातत्य कमी आहे. संततधार पाऊस आता उसंत घेऊन पडतोय. जेथे २४ तासांत चारपाच इंच व त्याहून अधिक पाऊस व्हायचा तेथे आता २० व ३० मिमीवर आला. शनिवारी (२ ऑगस्ट) सकाळी ६ वाजता भंडारदरा धरण ११, घाटघर २०, पांजरे १३, रतनवाडी २९, वाकी १७, निळवंडे १, अकोले १ व आढळा धरणावर शून्य मिमी पावसाची नोंद झाली. हेडलाइट व फॉग लॅम्प लावून घाटघर येथे धुक्यातून मार्गक्रमण करताना पर्यटक. आम्ही धुक्यास वैतागलो, पर्यटकांना मात्र अप्रूप ^माझ्या ११ एकर भातखाचरांच्या आवण्या पूर्ण झाल्या. घाटघर शिवारात दररोजच धुके पडते. धुक्यात काम सुधरत नाही. अपघाताची भीती वाटते. पण शेंडी, रतनवाडीकडून वेगात पर्यटक गाड्यांना घाटनदेवीपर्यंत धुक्यातच येण्याचे साहस करतात. आम्ही तर धुक्यास वैतागलो आहे, पण येथे धुके पहायला पर्यटकांना अप्रूप वाटते.- तुकाराम शिंदे, ग्रामस्थ, घाटघर.

Aug 6, 2025 - 14:36
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow