रामदास कदम म्हणजे 'बामदास छमछम':भास्कर जाधवांचा हल्लाबोल, पक्ष सोडून गेलेल्यांवरही जोरदार टोलेबाजी
शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांनी आज सभा घेत जोरदार भाषण केले. भास्कर जाधव यांनी त्यांच्या आक्रमक शैलीत सत्ताधाऱ्यांवर चांगलाच हल्लाबोल केला. यावेळी बोलताना त्यांनी जे पक्ष सोडून गेले त्यांच्यावर टीका केली तसेच शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यावर देखील टोलेबाजी केली. रामदास कदम यांचा 'बामदास छमछम' असा उल्लेख करत त्यांची खिल्ली उडवली. रामदास कदम यांच्यावर टीका करताना भास्कर जाधव म्हणाले, रामदास कदम म्हणायचे नाही आता बामदास छमछम म्हणायचं. मी त्या रामदास कदम बद्दल फार काही बोलत नाही. मूर्ख आहे तो, हे येडं आहे अशा शब्दात त्यांनी कदम यांना सुनावले आहे. रोज सकाळ - संध्याकाळ ते उद्धव ठाकरेंवर बोलत असतात. पण रामदास कदम स्वतःच पोराला संपवतोय. भाषणात काय म्हणतो भास्कर जाधव माझ्या पाया पडतो मला तिकीट दे म्हणून. मी कधीही रामदास कदम यांच्या पाया पडलो नाही. आई कोटेश्वरीच्या मंदिरात उभा राहा, मी पण येतो, मी कधी पाया पडलो नाही, पण हा माझ्या दोन वेळा पाया पडला. 2009 ते 2014 मध्ये मी मंत्री असताना रामदास कदम यांनी एक दिवस माझे पाय धरले होते. ते ही विधिमंडळाच्या लॉबीत अधिवेशन चालू असताना. शिवाय मला विरोध करू नको, मी राष्ट्रवादीत येतोय. मला राज्यमंत्रिपद देत आहेत. पण मी कॅबिनेट मागतोय, मला देत नाहीत असे ही कदम यांनी आपल्याला सांगितले होते. त्यावर आपण कशाला विरोध करू असे उत्तर त्यांना दिले होते. तू माझ्या पाया पडलास मी नाही रामदास कदम हा वाघ नाही तर हा बिबट्या आहे. नागपूर अधिवेशनात एकदा ते मला भेटले. त्यावेळी रडायला लागले असे म्हणत त्यांनी कदम यांची नक्कल केली. शिवाय माझ्या योगेशदादाला सांभाळा म्हणून त्यांनी आपले पाय धरले असे ही भास्कर जाधव यावेळी म्हणाले. तू माझ्या पाया पडलास, मी तुझ्या पाया पडलो नाही असे थेट जाधव यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी त्यांच्या डान्सबार प्रकरणावर ही वक्तव्य केले. लाज वाटली पाहिजे तुम्हाला 30 वर्षे बार पत्नीच्या नावावर होता. भडवेगिरीचे पैसे कमावले असा हल्लाबोल त्यांनी केला. तुम्ही गृहराज्यमंत्री होतात तेव्हाही आणि आता मुलगा गृहराज्यमंत्री झाला तेव्हा बार बंद करावासा वाटला नाही असा टोलाही त्यांनी लगावला. ऑपरेशन सिंदूरवरून पंतप्रधानांवर टीका पहलगाममध्ये 26 पर्यटकांना जात धर्म विचारून मारण्यात आले, त्यानंतर त्याला उत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर करण्यात आले. कोणाचा तरी नवरा पत्नीच्या देखत मारला गेला, कोणाचा मुलगा आपल्या आईसमोर मारला गेला. एक तर नवीनच लग्न झालेले जोडपे तिथे फिरायला गेले होते. लग्नाच्या चौथ्या दिवशीच तिच्या नवऱ्याला तिच्या डोळ्या देखत मारण्यात आले. तुम्ही सगळ्यांनी तो फोटो पाहिला असेल, ती पत्नी आपल्या मृत पतीचा देह मांडीवर घेऊन बसली होती. तो फोटो ऑपरेशन सिंदूरच्या बॅनरवर लावले गेले. आपण भावनिक होतो. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा पंतप्रधान पदाचे उमेदवार होते, तेव्हा हे देशभर फिरत भाषणात तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांना प्रश्न विचारात होते भारतात अतिरेकी येतात कुठून? आज या देशाचे पंतप्रधान मोदी अकरा वर्ष झाले पंतप्रधान आहेत. आपण कोणीतरी हा प्रश्न विचारू नये म्हणून आपण चौकीदार असल्याचे सांगतात. ऑपरेशन सिंदूर 35 मिनिटे चालले आणि युद्ध बंदीची घोषणा कोणी केली डोनाल्ड ट्रॅम्प यांनी. मोदींना लोकसभेत प्रश्न विचारण्यात आला, त्यावर उत्तर देताना त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांना शिव्या दिल्या, इंदिरा गांधींना शिव्या दिल्या. उत्तर दिले पाहिजे त्यांनी. सगळी यंत्रणा तुमच्या हातात असताना हे अतिरेकी आले कसे? कॉंग्रेसला प्रश्न विचारात होता तुम्ही. हे अतिरेकी देशात आले, राहिले आणि 26 जणांना मारून गेले. तिथे एकही मिलिटरीचा माणूस कसे काय पोहोचला नाही? चौकीदार म्हणून तुम्ही योग्य आहात? देशाला तुम्ही फसवत आहात. इंदिरा गांधी जेव्हा पंतप्रधान होत्या तेव्हा पाकिस्तानसोबत युद्ध झाले होते. तेव्हा सगळ्या जगाने भारतीय सैन्य मागे घ्यायला सांगितले, तेव्हा इंदिरा गांधींनी ठणकावले आणि उत्तर दिले खबरदार आमच्यामध्ये पडलात तर. त्यांनी सैन्य तर मागे घेतले नाहीच शिवाय युद्ध जिंकूनही दाखवले. आज आपल्याला पाकव्याप्त काश्मीर मिळवण्याची संधी होती. पण यांनी माघार घेतली. ज्यावेळी हल्ला झाला तेव्हा पंतप्रधान दुसऱ्या देशात होते, तिकडून आल्यावर ते निवडणुकीच्या प्रचाराला गेले. देशात सामाजिक तेढ निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न देश आता हुशार झाला आहे, आता जातीय दंगली नाही होत. परंतु, देशात सामाजिक तेढ निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू आहे. राज्यात सगळे मंत्री जे वाटेल ते बडबड करत आहेत. वाट्टेल ते बोलतात, एकमेकांचे बाप काढले जातात. 27 तारखेला जो पक्षप्रवेश झाला, आम्ही सत्तेसाठी गेलो म्हणाले. भास्कर जाधव यांनी सन्मानाची वागणूक दिल्याचेही ते म्हणाले. पण मी माझ्या पत्रात लिहिले की ते स्वार्थासाठी गेले. सुप्रीम कोर्टाचा निकाल लागणार आहेच, शिवसेना पुन्हा उद्धव ठाकरेंकडे येणार. पण जर नाही घडले तर आज मी सांगतो, आपण निर्धार करायचा पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंची सत्ता आणायची. नेत्रा ठाकूर यांच्यावर हल्लाबोल काय कमी पडले असेल आमच्या नेत्रा बाईला? महिला सीट पडली तूच, महिला ओबीसी पडली तूच, महिला ओपन पडली तूच, ओपन पुरुष पडला तूच, कमी काय पडले? त्यांच्या पोटात गोळा पडला. नेत्रा ठाकूर कोणाला बुडवणार माहीत नाही. रत्नागिरीमध्ये बातम्या वाचतात की नाही? मनसेने एक स्पर्धा सुरू केली आहे. जो रस्त्यावरील खड्ड्यांची चांगली रील बनवेल त्याला बक्षीस देण्यात येईल. यात रामदास कदम यांनाच बक्षीस मिळेल, असे म्हणत भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांना टोला लगावला. मला सोडून जाताना नेत्रा ठाकूर काय म्हणाल्या कुणबी समाजाचे प्रेशर आहे. सगळा कुणबी समाज सत्तेत जायचे म्हणत आहे. कुणबी समाजाने नेत्रा ठाकूरचे नेतृत्व स्वीकारले असल्याचे मेसेज पाठवण्यात आले. भास्कर जाधव घाबरले आहेत म्हणाले. तेव्हा भास्कर जाधव यांनी उपस्थितांना सवाल केला इथे कुणबी किती आहे

What's Your Reaction?






