वातावरणातील बदल उठला जीवावर:अमरावतीत पाच वर्षांतील सर्वात उष्ण ऑगस्ट, तापमान 36 अंशांपर्यंत

यावर्षीच्या ऑगस्ट महिन्यात अद्याप टिपूसभरही पाऊस पडला नाही. त्यामुळे सन २०२१ पासूनच्या गेल्या पाच वर्षांतील सर्वात उष्ण आठवडा म्हणून यावर्षीच्या ऑगस्टने नवा विक्रम नोंदविला आहे. तर तिकडे पाऊस अजूनही सरासरीपासून १५६.९ मिलीमीटर दूर आहे. गेल्या महिन्याचा शेवटचा आठवडा हा सलग पर्जन्यवृष्टीचा आठवडा होता. तर या आठवड्यात पावसाचा थेंबही न आल्याने उकाडा प्रचंड वाढला आहे. वातावरणाच्या या अजब स्थितीमुळे शेतकऱ्यांसह सर्वांच्याच चिंतेत भर पडली आहे. गेल्या एक ऑगस्टपासून अमरावती जिल्ह्यात ऊन चांगलच तापत आहे. ३२ ते ३६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमानाची नोंद झाली. १ ऑगस्टला ३२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तर आज, ७ ऑगस्टला आठवड्याच्या शेवटच्या दिवशी पारा ३६ अंश सेल्सिअसवर पोहोचला, अशी शासकीय जलविज्ञान केंद्राची नोंद आहे. ऐन पावसाळ्याच्या दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात तापमान वाढल्याने दुपारच्यावेळी नागरिकांना अक्षरश: उपरण्यांचा आधार घेऊन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावे लागत आहे. सर्वसाधारणपणे ऑगस्ट व सप्टेंबर हे दोन महिने बऱ्यापैकी पावसाचे महिने समजले जातात. पिकांनाही यावेळी पावसाची गरज असते. परंतु थेट आठवडाभरापासून पाऊस गायब झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत अधिक वाढ झाली आहे. सध्या डौलदार झालेल्या सोयाबीन आणि कापसाचे भविष्यात काय होईल, याबाबत ते साशंक झाले आहेत. ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात साधारणत: चांगलाच पाऊस असतो. परंतु यावर्षी निसर्गाने काहीतरी वेगळीच किमया केल्यामुळे उकाडा प्रचंड वाढला आहे. असह्य झालेल्या या उकाड्यापासून दिलासा मिळवण्यासाठी नागरिकांना गेल्या काही दिवसांपूर्वी बंद केलेले कुलर नव्याने सुरु करावे लागत आहेत. त्यामुळेच केव्हा एकदाचा उकाडा संपतो आणि केव्हा पाऊस पडतो, अशा प्रतिक्रिया नागरिकांद्वारे ऐकायला मिळत आहेत.

Aug 8, 2025 - 07:09
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow