पाच दिवसांपासून आंदोलन:नेपाळमध्ये राजेशाही आंदोलन चिरडण्याची तयारी, अटकेच्या भीतीने नेते भूमिगत, दोन प्रमुख नेत्यांसह 61 लोकांवर नोंदवले गुन्हे
नेपाळच्या रस्त्यावर राजेशाहीची बहाली आणि हिंदू राष्ट्राच्या मागणीसाठी आवाज तीव्र होत असताना सरकारने कठोर पावले उचलली आहेत. पाच दिवसांपासून सुरू असलेले हे आंदोलन आता वेगाने पसरत आहे. त्यामुळे नेपाळच्या राजकारणात अस्वस्थता वाढत आहे. लोकशाहीची ओळख सांगणाऱ्या प्रजासत्ताक दिवसाच्या जल्लोषादिवशीच हे आंदोलन सुरू झाले, हे विशेष. रस्त्यावर गर्दी उसळली. लोकांनी मेणबत्त्या पेटवल्या. राजे बीरेन्द्र यांच्या कुटुंबातील हत्या झालेल्या सदस्यांना लोकांनी श्रद्धांजली वाहिली. त्यामुळे एक मोठा वर्ग वर्तमान व्यवस्थेविरुद्ध असल्याचे स्पष्ट झाले. आता पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या सरकारने हे आंदोलन चिरडण्याची तयारी केली आहे. काठमांडूच्या रिंग रोड क्षेत्रात मज्जाव करण्यास दोन महिन्यांसाठी बंदी घालण्यात आली आहे. दुसरीकडे राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टीचे (आरपीपी) दोन प्रमुख नेते रवींद्र मिश्र आणि धवल समशेर राणा सरकारच्या कारवाईमुळे भूमिगत झाले आहेत. त्यांचे मोबाइल फोन बंद आहेत. ते सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर आहेत. मिश्र आणि राणा यांच्याशिवाय आंदोलनात सहभागी इतर नेते अटकेच्या भीतीने भूमिगत झाले आहेत. या दोघांसह ६१ लोकांवर विविध कलमांखाली गुन्हे नोंदवण्यात आले. हत्याकांड व श्रद्धांजली: माजी राजकुमारी, त्यांची मुलेही आंदोलनात झाली सक्रिय काठमांडूत रविवारी नारायणहिटी राजदरबार हत्याकांडाला २३ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने समर्थकांनी मेणबत्त्या पेटवून दिवंगत शाही कुटुंबाला श्रद्धांजली वाहिली. या कार्यक्रमात माजी राजकुमारी हिमानी शाह आणि त्यांचे पुत्र ह्रदयेंद्र उपस्थित होते. एखाद्या आंदोलनात शाही कुटुंब सार्वजनिकरित्या सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ. या श्रद्धांजली कार्यक्रमात नेपाळच्या माजी राजकुमारी आणि हजारो समर्थक सहभागी झाले. राजकुमारींनी समर्थकांसमवेत एका सार्वजनिक कार्यक्रमात श्रद्धांजली वाहिली. त्यातून जनतेतील एका मोठा वर्ग राजेशाहीच्या बाजूने असल्याचा स्पष्ट संदेश दिला आहे. माजी नेपाळ नरेश यांचे अंतर... झापामध्ये बनवतायत रणनीती माजी नेपाळ नरेश ज्ञानेंद्र शाह यांनी काठमांडूशी अंतर राखले आहे. ते राजधानीपासून दूर झापा येथील दमकमध्ये ‘मिनी पॅलेस’मध्ये वास्तव्यास आहेत. ते दोन आठवडे तेथे राहतील. सुत्रांचे म्हणणे आहे की, ते खासगी स्तरावर राजकीय भेटीगाठी करून धोरण ठरवत आहेत. मात्र त्यांच्या सचिवालयाने कोणत्याही औपचारिक राजकीय कार्यक्रमाची पुष्टी केली नाही. असेही धोरण: आंदोलनाविरुद्ध तिन्ही मोठे पक्ष आले एकत्र तीन प्रमुख राजकीय पक्ष- नेपाळी काँग्रेस, सीपीएन-यूएमएल व माओवादी केंद्रने या आंदोलनाविरुद्ध लढण्याची घोषणा केली. सोमवारी सिंगदरबार स्थित पंतप्रधान कार्यालयात बैठक झाली. त्यात पीएम ओली, नेपाळी काँग्रेस प्रमुख शेर बहादूर देउबा व माओवादी नेते पुष्पकमल दहल प्रचंड यांनी आंदोलनाविरुद्ध स्पष्ट सहमती दर्शवली. तिन्ही पक्षांनी हे स्पष्ट केले की, संविधान-लोकशाही विरोधी आंदोलन यशस्वी होऊ दिले जाणार नाही. नारायणहिटी राजदरबार हत्याकांड होऊन २३ वर्षे झाली. माजी राजकुमारी हिमानी शाह यांनी राजेशाही समर्थकांसह दीप प्रज्वलित श्रद्धांजली दिली. छाया : प्रकाशचंद्र तिमिल्सेना

What's Your Reaction?






