मोठा कट उजेडात:बांगलादेश ठरतोय कुकी बंडखोरांचा आश्रयदाता, 30 हजार गणवेश जप्त, छुप्या युद्धासाठी एक हजारावर कट्टरवाद्यांना दिले प्रशिक्षण
बांगलादेशातील चटगावमध्ये प्रतिबंधित अतिरेकी संघटना ’कुकी चिन नॅशनल फ्रंट’चा एक मोठा कट उघड झाला. सुरक्षा यंत्रणांनी एका कारखान्यावर छापा टाकून सुमारे ३० हजार लष्करी गणवेश जप्त केले. त्यांची किंमत सुमारे २० कोटी टका होती. धक्कादायक म्हणजे यापैकी १० हजार गणवेश आधीच केएनएफच्या अतिरेक्यांपर्यंत पोहोचले होते. प्राथमिक तपासानुसार या गणवेशांचा वापर करून केएनएफ भारत, म्यानमार, आणि बांगलादेशात एकाच वेळी त्रिकोणीय युद्ध छेडण्याचा कट रचत होता. या अंतर्गत भारताच्या मणिपूर, मिझोराम, म्यानमारच्या चिन आणि राखेन स्टेट तसेच बांगलादेशच्या चटगाव हिल ट्रॅक्ट्सना लक्ष्य केले जाणार होते। बांगलादेशातील सुरक्षा यंत्रणांच्या गुप्तचर अहवालानुसार या संघटनेकडे संघर्षात प्रशिक्षित सुमारे तीन हजार अतिरेकी आहेत. त्यापैकी हजाराहून अधिक जणांना नुकतेच प्रशिक्षण देण्यात आले. केएनएफच्या कारवायांबाबत भारतातही सतर्कता आहे. कारण २०२४ च्या मणिपूरमधील रॉकेट हल्ल्यांमध्ये या संघटनेचा सहभाग असल्याची शक्यता आहे. याशिवाय केएनएफने बांगलादेशात अनेक बँक दरोडेही घातले आहेत. परदेशी निधी आणि कूटनीतिक संघर्षामुळे केएनएफ मजबूत चीन आणि अमेरिकेकडून अप्रत्यक्ष पाठिंबा मिळत असल्याच्या बातम्या आहेत. त्यात निधीचा समावेश आहे. म्यानमारमधील क्योकप्यू पोर्टवर चीनच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला हानी पोहोचवण्यासाठी अमेरिका केएनएफसारख्या संघटनांचा वापर करत आहे. गुप्तचर यंत्रणांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. कुकी चिन नॅशनल फ्रंट या संघटनेने बांगलादेशात अल कायदा समर्थित दहशतवादी संघटना अंसार अल इस्लामशी गुप्त करार केला आहे. सूत्रांनुसार केएनएफच्या अनेक अतिरेक्यांना अंसारच्या दहशतवादी छावण्यांमध्ये छुपे युद्ध आणि आत्मघाती हल्ल्यांचे प्रशिक्षण देण्यात आले. या बदल्यात केएनएफने अंसारला डोंगराळ भागात लपण्यासाठी सुरक्षित आश्रयस्थान आणि रसद देण्याची तयारी दर्शविली आहे. ही हातमिळवणी केवळ बांगलादेशसाठीच नव्हे, तर भारत आणि म्यानमारसाठीही चिंतेचे कारण बनले. विश्लेषकांच्या दृष्टीने केएनएफ आता कट्टरवादी इस्लामी दहशतवादी नेटवर्कचा भाग बनत आहे. नोटांवरील मुजीबूर रहेमानचे चित्र गायबबांगलादेशच्या अंतरिम सरकारने राष्ट्रपिता,संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांची प्रतिमा नोटांवरून काढून टाकली. आता नोटांवर कोणत्याही व्यक्तीचा फोटो नाही. बांगलादेश बँकेचे प्रवक्ते आरिफ हुसैन खान म्हणाले, नवीन नोटा जूनच्या पहिल्या आठवड्यापासून उपलब्ध होतील. ते म्हणाले, सध्या २०, ५० आणि १००० टकाच्या नोटांमध्ये बदलल्या. ‘कुकीलँड’चे स्वप्न काय आणि केएनएफ कुठेपर्यंत पसरले? केएनएफची स्थापना २००८ मध्ये नाथन बॉम यांच्या नेतृत्वाखाली झाली. सुरुवातीला उद्देश सामाजिक विकास होते. २०१७ मध्ये ती सशस्त्र संघटना होऊन मुख्य उद्दिष्ट ‘कुकिलँड’झाले. अर्थात स्वतंत्र राष्ट्र. त्यात भारताचे मणिपूर, मिझोराम, म्यानमारचा चिन स्टेट आणि बांगलादेशचे चटगावचा यांचा समावेश असेल.

What's Your Reaction?






