आमदार अर्जून खोतकर यांच्या वक्तव्याचे पडसाद:विदर्भ खाटीक समाजसेवा समितीची कारवाईची मागणी‎

अमरावती आमदार अर्जुन खोतकर यांनी एका राजकीय वादविवाद कार्यक्रमात खाटीक समाजाबद्दल असभ्य वक्तव्य केले. या वक्तव्याचे पडसाद येथे उमटले असून, विदर्भ खाटीक समाजसेवा समितीतर्फे जिल्हाकचेरी परिसरात निदर्शने करण्यात आली. त्यानंतर आमदार गजानन लवटे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांमार्फ त मुख्यमंत्र्यांना निवेदनही पाठवण्यात आले. विदर्भ खाटीक समाजसेवा समितीच्या म्हणण्यानुसार आमदार अर्जून खोतकर यांच्या वक्तव्यामुळे आमची प्रतिमा क्रूर व निर्दयी दाखवण्याचा अवमानकारक प्रकार घडला आहे. त्यांच्या वक्तव्याने खाटीक समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. कुणाच्या भानगडीत न पडणारा समाज आमदार खोतकर यांच्या वक्तव्याने नाराज झाला आहे. समाजाच्या भावना दुखावणाऱ्या व समाजाला हीन लेखणाऱ्या या वक्तव्यामुळे त्यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी निवेदनातून केली आहे. तसे न केल्यास त्यांच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याचा इशाराही विदर्भ खाटीक समाजसेवा समितीने दिला आहे. निवेदन देताना आमदार गजानन लवटे यांच्याशिवाय विदर्भ खाटीक समाज सेवा संघाचे अध्यक्ष सुधीर लसनकर, भीमराव माकोडे, प्रा. रमेश खंडार, सुरेश वानखडे, श्रीराम नेहर, गोपाल हरणे, अविनाश हिरेकर, प्रा. लक्ष्मण कराळे, दीपक घन, गणेश नेहर, विश्वेश्वर विरुळकर, देवराव कुर्‍हेकर, संजय शेंडे, प्रतीक लसनकर, श्रीकांत विल्हेकर, संदीप काठोळे, नानाभाऊ धर्माळे, विनायक लवटे, प्रल्हाद कंटाळे, विठ्ठल मदने, किशोर दुर्गे, सुनील कुऱ्हेकर आदी समाज बांधव उपस्थित होते. जिल्हाकचेरीत जमलेले विदर्भ खाटिक समाजसेवा समितीचे पदाधिकारी, सदस्य.

Aug 7, 2025 - 11:47
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow